पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्ली मेट्रोने प्रवास केला. दिल्ली विद्यापीठात जाण्यासाठी पंतप्रधानांनी मेट्रो प्रवासाचा मार्ग निवडला. विद्यापीठाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमासाठी मोदींनी प्रवास केला आहे. पंतप्रधान मोदींनी यासाठी तिकीट काउंटरवरून टोकन घेतले आणि त्यानंतर ते प्लॅटफॉर्मवर पोहोचले. मेट्रोमधील प्रवाशांशी त्यांनी संवादही साधला.
नेहमीप्रमाणे मेट्रोमधून प्रवासासाठी निघालेल्या दिल्लीकरांना यामुळे आश्चर्याचा मोठा धक्का बसला. थेट पंतप्रधानांशी भेट झाल्यामुळे हे प्रवासी अतिशय आनंदात होते. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर हँडलवरून या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. “डीयूमधील कार्यक्रमाला जाताना दिल्ली मेट्रोमध्ये तरुण-तरुणींसोबत प्रवास करून आनंद झाला” अशा आशयाचं कॅप्शन देत पंतप्रधानांनी पोस्ट केली आहे.
