आदित्य ठाकरेंच्या शकुनी मामामुळे राहुल कनाल शिवसेनेत – नितेश राणे

भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांचे निटकवर्तीय वरूण सरदेसाई यांच्यावर टीका केलीये. तसंच राहुल कणाल यांच्या शिवसेना प्रवेशावरही भाष्य केलंय. शरद पवार यांच्या वक्तव्यालाही नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. जस उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी आहे. तसं वरूण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी आहे, असं नितेश राणे म्हणालेत.आदित्य ठाकरेचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे लाडके राहुल कणाल उद्या शिवसेनेत प्रवेश करतायेत. हा त्यांच्यासाठी वैयक्तिक धक्काच आहे, असं नितेश राणे म्हणालेत.

वरुण सरदेसाईंच्या काड्या लावण्यामुळे आदित्य ठाकरेंच्या आजुबाजूला त्याचे नातेवाईक सोडून कोणीही उरलेले नाही. राहुल कनाल यांचा शिंदे गटात होणारा प्रवेश हा आदित्य ठाकरेंना आरसा दाखविणारा असल्याचे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला. वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे सख्खे मावस भाऊ आहेत.तसेच मुंबईतील कोविड घोटाळ्यामध्ये सर्वात आघाडीवर वरुन सरदेसाई होते. काही दिवसांमध्ये चौकशीत वरुन सरदेसाईंचे नाव समोर येणार आहे, असा आरोप राणेंनी केला आहे. जर याला लवकर आवरलं नाही तर उद्धव ठाकरेंप्रमाणे आदित्य ठाकरेंची अवस्था होईल. तसचे सरदेसाई हा लवकरच शिवसेना किंवा भाजपमध्ये येऊ शकतो, असेही राणे म्हणाले.

आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना कायम रिटायर करण्याचं काम संजय राऊत आणि सरदेसाई करत आहेत. 2019 ला बाळासाहेबांचे विचार विकून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन झालं होतं. 50 योध्ये सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना न्याय दिला, असं नितेश राणे म्हणाले.

वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदांना स्थगिती देण्यात आली आहे. या स्थगितीनंतर राहुल कनाल यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे. दुःख होतंय! हे कोणी केले हे चांगले माहित आहे पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केले आहे अशा लोकांना न ऐकता काढून टाकणे म्हणजे अहंकार आहे आणि तुम्ही मला हटवू शकलात. पण, त्या लोकांना नाही ज्यांनी रात्रंदिवस काम केले. तरीही चलो अच्छा है सबको पता चले की अहंकार और अहंकार क्या होता है, अशा शब्दात राहुल कनाल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.