महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात शरद पवार यांचं नाव शकुनी मामा म्हणून लिहिलं जाईल – सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली.सोलापुरातील कासेगाव इथं शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना सदाभाऊ खोत यांनी चौफेर फटकेबाजी करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. सहकारी कारखाना बंद पडला की लगेचच घेतात. बंद पण हेच पाडतात आणि खासगी करुन हेच चालवतात असे खोत म्हणाले.

राज्यपाल राजवट उठवण्यासाठी अजित दादाला शपथ घेण्यासाठी शरद पवारांनी पाठवल हे मी सोलापुरात बोललोच होतो. त्यानंतर परवा त्यांनी खरं सांगितलं मी गुगली टाकली होती, हे महान क्रिकेटपटूच आहेत. महाराष्ट्रचा राजकारणाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा शरद पवार यांचा नाव शकुनी मामा म्हणून लिहिला जाईल, असं सदाभाऊ म्हणालेत.मी बोललो की झेंडे नाचवत आंदोलन करतात, पण मागील 60-65 वर्षात या देशातील पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या या सर्वांना तुम्ही जबाबदार आहात, असं म्हणत पवारांवर सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र डागलंय.

राष्ट्रवादी हा पक्ष नाही ही टोळी आहे. अलीबाबा आणि चाळीस चोर सहकारी कारखाना बंद पडला की लगेचच घेतात, बंद पण हेच पडतात आणि खासगी करून हेच चालवतात. सहकारीमधून खासगीकरण केलेले शरद पवार यांच्या ताब्यात जवळपास 50 कारखाने आहेत. स्वर्गात जाताना खालूनवर नेता आलं असतं या जातीने खाली काहीच ठेवलं नसतं, नेता येतं नाही म्हणून जमलंय, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

शेतकरी स्वप्न घेऊन जगत आहे. पूर्वीच्या काळात संपूर्ण अर्थशास्त्र शेतीभोवती होतं. पूर्वीच्या काळात शेतीचा भार 75 टक्के होता आता तो 40 टक्के इतका झाल्याचे खोत म्हणाले. एक क्वार्टरचा भाव 180 रुपये इतका असेल तर शेतकऱ्याच्या दुधाला 30 मिळणार असतील तर कसं चालेल असेही ते म्हणाले. तुम्हाला मत कोणाला द्यायचा ते द्या, तुमची हौस फिटलेली नाही. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक व्हा असं आवाहनहीखोत यांनी केलं. मी आमदार झालो, मंत्री झालो पण पदासाठी कोणत्याही पक्षात गेलो नाही. माझा एकच पक्ष आहे तो म्हणजे गावगाड्यातील शेतकरी असे खोत म्हणाले.