मोर्शी येथे ‘जत्रा शासकीय योजनांची’ उपक्रम राबवण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनात जत्रा शासकीय योजनांची कार्यक्रम राबवनाऱ्या महाराष्ट्र सरकारचे राज्यसभेचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आभार मानले.मोर्शी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज ‘जत्रा शासकीय योजनांची’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.बोंडे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने लोकाभिमुख योजना कार्यान्वित करून नागरिकांच्या विकासाचे व्रत हाती घेतले आहे.विविध दुर्धर आजारांवर उपचार वैद्यकीय महाविद्यालय,एम्स अशा नामांकित वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. बाराशे विविध प्रकारच्या आजारांचा त्यामध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारने महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारचे 6 हजार व राज्य शासनाची सहा हजारांची मदत त्यांना बँकेच्या खात्यावर उपलब्ध करून दिली जात आहे. बांधकाम कामगार, पेंटिंग, सुतार काम करणारे या सर्वांना योजनांचा लाभ दिला जात आहे असेही ते म्हणाले. तालुक्याच्या क्षेत्रामध्ये शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्या योजनांचा लाभ पोहोचवावा अशा सूचना त्यांनी विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. महिला बचत गटांचा विकास होत आहे. 35 टक्के सबसिडीवर त्यांना विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. सेवा हमी कायदा अंतर्गत शासकीय कार्यालयांमधील पेंडेन्सी दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे.जनधन योजना, मातृवंदन योजना यासह देशातील 140 कोटी जनतेला मोफत कोरोणा लस सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याचे खा. डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना वेठीस धरू नका
पीक कर्ज हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. तो त्यांना मिळालाच पाहिजे. त्यासाठी सीबीलची आवश्यकता नसल्याचे निर्देश यापूर्वीच उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले तर कोणाचेही खैर केल्या जाणार नसल्याचे डॉ. अनिल बोंडे यावेळी म्हणाले.
समस्यांचे थेट निराकरण
कृषी विभाग, पशुसंवर्धन, मनरेगा, आरोग्य, बचत गट, पुरवठा, संजय गांधी निराधार योजना, सहकार, मुद्रांक, बांधकाम आदी विभागांच्या उपस्थितीत डॉ.अनिल बोंडे यांनी थेट नागरिकांच्या समस्यांचे निराकरण सुद्धा केले.
