समृद्धी महामार्गावर झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ट्रॅव्हल्समधील २५ प्रवाशाचा मृत्यू झाला. या घटनेचा मुंबईच्या फॉरेन्सिक फायर ॲण्ड सायबर इन्वेस्टीगेटर्स या खासगी संस्थेने तपास करुन अहवाल बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या अहवालात आगीचे खरे कारण पुढे आले आहे.
या अहवालानुसार, मध्यरात्री अपघात रात्री १.३२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात झाला त्यावेळी, बसमध्ये ३५० लिटर डिझेल होते. अकरा-साडेअकराच्या सुमारास बस समृद्धी महामार्गावर आली. ७० ते ८० किलोमीटर प्रति तास बस धावत होती. महामार्गाच्या पहिल्या लेनमध्ये म्हणजे ओवरटेकिंग लेनमध्ये धावत असताना अचानक बसचे समोरचे चाक रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईन बोर्ड आणि नंतर थोड्या अंतरावर असलेल्या दुभाजकालाही धडक झाली.याच दुभाजकाला बसचा पाठीमागचा चाकही त्याच पद्धतीने धडकला आणि त्यामुळे बस एका दिशेने झुकली. जेव्हा बसचा मागील चाक आरसीसी काँक्रिट दुभाजकाला धडकला, तेव्हाही धडक एवढी भीषण होती की मागील टायर फुटला आणि टायरच्या आतील लोखंडी रिंग ही मोडकळीस आली.
चाके दुभाजकाला धडकल्याने बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. चालकाच्या बाजूच्या समोरच्या आणि मागच्या चाकाची दुभाजकाला धडक झाल्यानंतर बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूला रस्त्यावर उलटली. त्यामुळे बसचा मुख्य द्वार खाली दाबला गेला. फॉरेन्सिक फायर अहवालाप्रमाणे जेव्हा बस एका बाजूला झुकली आणि काही अंतरावर जाऊन डाव्या बाजूने पडली.तोच एक्सेल डिझेल टँकवर आदळला. यामुळे ३५० लिटर डिझेल उडाले. डिझेल टँकच फुटून ते डिझेल बसच्या इंजिनच्या हॉट एक्झॉस्टच्या संपर्कात आले, त्यामुळे बसने मोठा पेट घेतला. याच आगीत होरपळून २५ जणांनी आपले प्राण गमावले.
त्याचबरोबर बसबाबत आणखी धक्कादायक माहिती समोर येत आहे.विदर्भ ट्रॅव्हल बसचा हा भीषण अपघात झाला त्या ट्रॅव्हल्सच्या मालकाला अनेकदा नियमांचे उल्लंघन करूनही परिवहन विभागाने वाहन चालविण्याची खुली सूट दिली असल्याचे उघडकीस आले आहे. ट्रॅव्हल्स संचालकांवर यापूर्वी अनेकदा वाहतूक नियमांचा उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारले आहेत. मात्र हा दंड कधीही भरला गेला नाही. मात्र अपघात झाल्यानंतर अवघ्या काही तासातच सर्व चालान ऑनलाइन पद्धतीने भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. परिवहन विभागाने हे दुर्लक्षित धोरण अवलंबिण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
