अनेक लोकं स्वप्न पाहतात.पण ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून मेहनत करणारे फार कमी असतात.त्यामधीलच एक म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत.देवेंद्र फडणवीस हे झोप विसरून मेहनत करतात.महाराष्ट्राचे दबंग नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची ओळख असली तरी त्यांना जनसामान्यांप्रती तळमळ असलेले कुशल प्रशासक म्हणून त्यांची ख्याती आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म एका सुसंस्कृत,सर्वसामान्य घरात झाला. फडणवीस कुटुंब मूळ चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथील.त्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस व काका बाळासाहेब फडणवीस संघाचे स्वयंसेवक तर आई सरिताताई या अमरावतीच्या कलोती या राजकीय घराण्यातील त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र फडणवीसांना संघ संस्काराबरोबरच राजकीय वारसाही लाभला. एक कुशाग्र बुद्धीचा मुलगा म्हणून शाळा-महाविद्यालयामधून त्यांनी आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. निवडणुका, वक्तृत्व,वादविवाद स्पर्धातूनही त्यांनी आपल्या वक्तृत्वाची व नेतृत्वाची झलक दाखवायला सुरुवात केली होती. विद्यार्थी परिषद व भाजप युवा मोर्चात काम करताना अनेक भाजप कार्यकर्ते व नेते त्यांच्याकडे आकर्षित झाले.त्यांचा शांत, संयमी तसेच कणखर स्वभाव सर्वांनाच आवडायचा. त्यामुळेच वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक आणि सर्वात तरुण महापौर हे विक्रम त्यांच्या नावी जमा झाले.त्यानंतर आमदार, विरोधी पक्षनेते, प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यासारखी पदे त्यांच्याकडे आपसूकच चालून आली.
हिंदुत्ववादी,पक्षनिष्ठा,प्रामाणिकपणा,अभ्यासूवृत्ती यामुळे फडणवीसांची विधानसभेतील कामगिरी सर्वांच्याच नजरेत भरली विचारांशी,पक्षाशी तडजोड न करणारा प्रामाणिक मेहनती नेता असा त्यांचा लौकिक होताच. म्हणून पक्षाने अत्यंत कमी वयातही त्यांच्यावर महाराष्ट्रातील पक्षनेतृत्वाची म्हणजे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली.त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात महाराष्ट्र पिंजून काढला. राज्यातील आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा त्यांनी पर्दाफाश केला.जनसामान्यांच्या प्रत्येक हाकेला ते धावून गेले. त्यामुळे राज्यातील जनतेने त्यांच्याकडे विश्वासाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली
2014 ते 2019 या काळात पारदर्शक काम भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र त्यांनी घडविला. यासाठी वाटेत येणाऱ्या काट्याकुट्याची त्यांनी पर्वा केली नाही.शिवसेना-भाजप युती तोडण्याचा अवघड निर्णय विधानसभा निवडणुकीनंतरच्या निकालाने सोपा झाला. मात्र, शिवसेना सुरुवातीला विरोधात आणि नंतर सत्तेत सहभागी होऊनही सतत सरकारला विरोध करत राहिली. विरोधक आणि सत्तेतील सहभागी मित्र यांचा सततचा विरोध झेलला. जातीयवादाच्या विरोधात लढणाऱ्या फडणवीसांना जातीवरून हिणविले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक डाव टाकले.देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. तरी कुठेही न डगमगता महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय फडणवीस यांनी घेतले. त्यांच्या कार्यशैलीमुळे विरोधातील आमदारही खाजगीत त्यांचं कौतुक करतात. ते कधीच कोणावर चिडत नाहीत. कोणतेही काम घेऊन गेलेला माणूस त्याचं काम होणार असो अथवा नसो तो नाराज होऊन कधीच परतत नाही.देवेंद्र फडणवीस यांच्या या कार्यशैलीची भीती विरोधकांना सतत वाटत असते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस व सरकारबद्दल नाराजी कशी निर्माण होईल, याचा विरोधकांनी प्रयत्न केला. मात्र त्यांनी जितका विरोध केला तितकी देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा अधिक उजळून निघाली. ग्रामपंचायतीपासून ते पंचायत समित्या, जिल्हापरिषदा,महानगरपालिका,नगरपालिका अगदी लोकसभेच्या निवडणुकांत देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाले. चौथ्या क्रमांकावर असलेली भाजप महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आला.
सत्याचा पेहराव चढविलेल्या असत्याच्या अंगणात गुगली, खंजिर, कात्रजचा घाट ही सगळी भावंडे गुण्यागोविंदाने खेळत असतात.राजकारण हे स्वच्छ मनाने, निकोप स्पर्धेतून आणि विकासाच्या चर्चेतून करायवाचे देशकार्य नसून परस्परांना फसवून, एकमेकांची माणसे फोडून आणि आयत्यावेळी विश्वासघात करून करावयाचे जणू अधो-विश्वातले शौर्यकर्म आहे. शरद पवारांपासून असा संस्कार महाराष्ट्रावर गेली अनेक वर्ष सातत्याने होतो आहे. त्यातूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळी राजभवनात जाऊन शपथ घ्यायला लावण्याचा डाव आखला गेला.शरद पवार हेच साऱ्या नाट्याचे सूत्रधार होते, हे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रात शरद पवार यांनी या प्रकारचा खेळ सन1978 पासून सुरू आहे.
कर नाही त्याला डर कशाला…
माणूस कुणीही असो, त्याच चारित्र्यहनन हा विरोधकांचा मनसुबा असतो. तो देवेंद्र फडणवीस असेल तर? विरोधक कुठलीही संधी सोडणार का? तर नाही. अतिशय निष्कलंक अशी प्रतिमा जपलेल्या देवेंद्रजीची प्रतिमा डागळण्यासाठी विरोधकांनी कित्येकदा कुभांड रचले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचं प्रकरण असेल किंवा फोन टॅपिंग प्रकरणात देवेंद्रजीना गोवण्याचा प्रयत्न. इथे विरोधकांची डाळ न शिजल्याने त्यांनी देवेंद्रजींच्या धर्मपत्नी अमृता फडणवीस यांना खोट्या कहाण्या रचून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. पण विरोधकांचा डाव देवेंद्रजीनी ओळखला. कर नाही त्याला डर कशाला याप्रमाणे अत्यंत धीरोदत्तपणे ते सामोरे गेले. निष्कलंक चारित्र्याच्या बळावर प्रकरण हाताळून विरोधकांचा डाव हाणून पाडलाच. सभागृहात या प्रकरणाचा मुद्देसूद उलगडा करत विरोधकांच्या कुकर्मचा भांडाफोड केला.
अमृता फडणवीस यांच्यासोबत ओळख झालेल्या अनिक्षा हिने मैत्रीचे नाटक केले. महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर वडिलांना पोलीस केस मागे घेण्यासाठी मदत करण्यास सांगितले. त्यासाठी ऑफर दिल्या. परंतु, अमृता फडणवीस यांनी त्यास भीक घातली नाही. नंबर ब्लॉक केला त्यामुळे तिने अनोळखी नंबर वरून व्हिडीओ, फोटो पाठवून त्यांना ब्लॅकमेल केले.पोलिसांना केलेल्या या तपासातून पुरावे, रेकॉर्ड मिळाल्याने विरोधकांचे मनसुबे समोर आले. अनिक्षाचे वडील अनिल जयसिंघनिया यांचे विरोधी पक्षांतील मोठ्या नेत्यासोबतचे संबंध आणि त्यांच्यासोबतचे संभाषण यावरून देवेंद्रजींची प्रतिमा मलिन करण्यासाठी विरोधकांचा ट्रॅप हाणून तर पाडला. त्यासोबतच सभागृहात सूचक वक्तव्य करून विरोधकांना एकप्रकारे चेकमेट केल्याने विरोधकांना पळता भुईसपाट झाली.
