अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी केल्याने दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर आता अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केले. तसंच, काँग्रेसचेही अनेक आमदार खासदार फुटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेसचे अनेक आमदार भाजपात जाण्याच इच्छुक असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनीही याबाबतम मोठा दावा केला आहे. शपथविधीनंतर पाटील यांनी जळगावात कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे अनेक आमदार-खासदार हे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात हे संपर्कात असलेले काँग्रेसचे आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील असा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर एकनाथ खडसे यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत यावं, आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कोणत्याही नेत्याला आम्ही तोच मान सन्मान देवू, असं अनिल पाटील म्हणाले.
एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत यावं, आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. कोणत्याही नेत्याला आम्ही तोच मान सन्मान देवू, असं अनिल पाटील म्हणाले. आमचं आवाहन आहे की गल्लीपासून दिल्लीतल्या नेत्यापर्यंत ज्यांना दादांसोबत काम करायचं आहे, जे जे लोक आज अजित पवार यांच्यासोबत नसल्याचे दाखवत आहेत, त्यांच्याशीही आम्ही संपर्क करू, असंही मंत्री अनिल पाटील म्हणाले.शेवटी बोलताना पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरेंचं जर पक्ष पळवला जातो असं म्हणणं असेल तर नेत्यांचं काम आहे पक्ष कसा ठिकाण्यावर ठेवला पाहिजे. आपल्याला आपला पक्ष सांभाळता आला पाहिजे. आपल्या बद्दल असलेले मत त्यांना कळत नसेल तर घरातला सुद्धा पळून जातो.हे तर पक्ष आहेत
