लोकमान्य टिळक हे लढाऊ चेतना, विचारधारा, धैर्य, बुद्धिमत्ता आणि अटल देशभक्तीसाठी ओळखले जातात. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ ही सिंहगर्जना लोकमान्यांनी केली होती. भारतीय म्हणून त्यांना ओळखले जाते.लोकमान्य टिळक हे केवळ राजकारणी नव्हते तर एक महान अभ्यासक आणि तत्वज्ञ होते. त्यांचे मूळ नाव बाळ गंगाधर टिळक होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात चिखली या गावी झाला. त्यांचा जन्म एका मध्यमवर्गी ब्राह्मण कुटुंबात झाला होता.त्यांच्या आजोबांचे नाव केशवराव होते. ते पेशवे राज्यात उच्च पदावर होते. त्यांच्या आईचे नाव पार्वतीबाई गंगाधर टिळक आणि वडिलांचे नाव रामचंद्र गंगाधरपंत टिळक होते. टिळकांचे वडील गंगाधरपंत हे एक शिक्षक होते. त्यांनी बाळ टिळकांना घरी संस्कृत, मराठी, गणिताचे उत्तम ज्ञान दिले होते.टिळकांनी १८६६ मध्ये पुण्याच्या एका शाळेत प्रवेश घेतला. टिळक शाळेत असताना खूप आशादायक विद्यार्थी होते. त्याचे शिक्षक, आई, वडील आणि इतरांचा त्यांचा अत्यंत अभिमान वाटायचा. १८७१ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी टिळकांचे सत्यभामाबाई नावाच्या मुलीशी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी डेक्कन कॉलेजमधून कला शाखेचे शिक्षण घेतले.
टिळकांनी १८८० मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी वासुदेव बळवंतच्या मदतीने बंडखोरीचा झेंडा फडकावून ब्रिटीश सरकारविरूद्ध निषेध केला. त्यांनी १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि आपले शिक्षण क्षेत्रातील कार्य सुरु केले. त्यानंतर त्यांनी १८८१ मध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी जनतेमध्ये स्वातंत्र्याबद्दल जनतेत जनजागृती आणि ब्रिटीश सरकारच्या अन्यायची जनतेला जाणीव करून देण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही दोन वृत्तपत्रे प्रकाशित करण्यास सुरुवात केली.बाल गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्राच्या रत्नागिरीतील चिखली गावात झाला.
टिळकांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक म्हणून ओळखले जाते. टिळकांचे राजकीय उद्दीष्ट म्हणजे लोकांसाठी स्वावलंबन आणि स्वराज्य मिळवणे किंवा स्वराज्य मिळवणे हे होते.
त्यांनी स्वदेशी आणि देशभरात मोठ्या प्रमाणावर परदेशी वस्तूंवर बहिष्कार घालण्यात सहभाग घेतला होता.टिळकांनी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे प्रकाशित केली.त्यांनी लोकांना एकत्र आणून त्यांना स्वातंत्र्याबद्दल प्रोत्साहीत करण्यासाठी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.१९०६ मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा आरोप लावून ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. मंडालेच्या या कारावासात त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला.१९१४ मध्ये कारावासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या संपूर्ण जीवनात त्यांचा वेळ, श्रम, पैसा आणि बुद्धीचा कस जर कुठल्या प्रकरणात लागला असेल तर ते म्हणजे ‘ताई महाराज’ प्रकरण. बाळा महाराजांची सारी मिळकत कायद्यानुसार टिळकांना जगन्नाथ महाराजांच्या ताब्यात द्यायची होती, पण बाळा महाराजांनी ते दडपण्यासाठी हायकोर्टात ‘इनामी उत्पन्न आपल्या देणगीचे आहे’ असा दावा करणारा अर्ज हायकोर्टात केला होता. जगन्नाथ महाराजांचे कैफियत तयार करण्याचे काम टिळकांनी आपल्याकडे घेतल्याने त्यासाठी त्यांना मुंबईला येणे भाग होते. ‘ताई महाराज’ प्रकरणाचा हा शेवटचा टप्पा एकदाचा संपवण्यासाठी लोकमान्यांनी १२ जुलैला पुणे सोडले. तो त्यांचा शेवटचा रेल्वे प्रवास ठरला. पुण्याहून निघतांना त्यांचा अंगात कणकण होती, पण दरवेळेप्रमाणे ह्यावेळी सुद्धा त्यांनी प्रकृतीकडे दुर्लक्ष केले आणि ते १२जुलैला सरदारगृहात येउन दाखल झाले. ठरल्याप्रमाणे १४जुलैला अर्जाची मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कामाचा ताण व प्रवासाचा त्रास त्यांच्या आधीच क्षीण झालेल्या प्रकृतीला झेपला नाही. निकालाच्या आदल्या दिवशी म्हणजे २०जुलैला टिळकांच्या तापाचा जोर वाढला तरी सुद्धा दिवाण चमनलाल यांच्या आग्रहाखातर संध्याकाळी लोकमान्य उघड्या मोटारीतून बरेच दूरवर फेरफटका मारून आले. चमनलाल यांच्या गाडीत सुमारे दोन तास त्यांनी गांधींच्या असहकारावर व भारतीय मजूर परिषदेच्या चळवळीवर चर्चा केली. मजूर परिषदचे अध्यक्षपद टिळकांनी स्वीकारावे अशी विनंती चमनलाल यांनी टिळकांना केली व लोकमान्यांनी त्याला मान्यता दिली व ते म्हणाले मजूरवर्गाकडे माझे लक्ष आहे. १९०८ साली मला शिक्षा झाली, तेव्हा गिरणी मजुरांनी माझ्याबद्दल केवढे प्रेम व्यक्त केले”. हे बोलतांना टिळकांचे मन समाधानाने भरून आले.वयाच्या ६४ व्या वर्षी १ ऑगस्ट १९२० रोजी टिळक यांचे देहावसान झाले.
