सर्वसामान्यांना मोठा दिलासा; व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात

ऑगस्ट महिन्याचा पहिला दिवस सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी घेऊन आला आहे. मंगळवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस सिलिंडरची किंमत जाहीर करण्यात आल्या असून 1 ऑगस्टपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात जाहीर झाली आहे. यावेळी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची मोठी कपात करण्यात आली असून गेल्या महिन्यात दरात किरकोळ वाढ नोंदवली गेली होती. अशा स्थितीत हॉटेल व्यावसायिकांना महिन्याचा पहिला दिवस दिलासादायक ठरला आहे. विशेष म्हणजे यावेळीही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात झाली असून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती जैसे थेच आहेत.

घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमती बदलतात. गेल्या महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत बदल झाला होता.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहरात गॅस सिलिंडरचे दर 93 रुपयांनी कमी झाले आहेत. येथे व्यावसायिक सिलिंडर आता 1802.50 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत 1640.50 रुपये, चेन्नईत 1852.50 रुपयांना सिलिंडर मिळेल. या कपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1680 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात या सिलिंडरची किंमत 1780 रुपयांवर पोहोचली होती.

1 – दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत: 1680 रुपये

2 – कोलकातामध्ये 1820.50 रुपये

3 – मुंबईत 1640.50 रु

4 – चेन्नईमध्ये 1852.50