मणिपूर हिंसाचार झाला नाही तर तो भडकवला गेला – मोहन भागवत

काही दिवसांपूर्वी मणिपूर येथे हिंसाचार झाल्याचा.प्रकार समोर आला होता. यावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठे वक्तव्य केले आहे. मणिपूर मध्ये जो हिंसाचार झाला तो तसा घडलेला नाही तर तो रण नितीनुसार घडलेला आहे. असे वक्तव्य मोहन भागवत यांनी केले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूर येथील रेशिमबाग येथे आयोजित राष्ट्रिय स्वयंसेवक संघच्या स्थानपा दिवस उत्सवात बोलताना संघप्रमुख मोहन भागवत यांनी हे वक्तव्य केले आहे.

यावेळी भागवत म्हणाले की, मणिपूर हिंसाचाराचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, जे काही घडले, शांतता भंग पावली, ती भंग केल्या गेली. गृहमंत्री तीन दिवस तिथे होते आणि त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. सरकारने कठोर पावले उचलली आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबुद्ध नेतृत्वालाही दुर्दैवी घटनांमुळे निर्माण झालेली परस्पर अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागणार असल्याचे भागवत म्हणालेत.