निलेश राणेंनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची घोषणा केली आहे. सक्रीय राजकारणातून कायमचा बाजुला होत असल्याची ट्विट करत कार्यकर्त्यांना माहिती दिली आहे. भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. ही पोस्ट त्यांनी त्यांच्या सोशल मीडीयावर शेअर केली आहे. निलेश राणे यांनी पोस्ट करत म्हटले की, नमस्कार,मी सक्रिय राजकारणातून कायमचा बाजूला होत आहे, आता राजकरणात मन रमत नाही, इतर काही कारण नाही. मागच्या १९/२० वर्षा मध्ये आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, कारण नसताना माझ्या सोबत राहिलात त्या बद्दल मी आपला खूप आभारी आहे. भाजप मध्ये खूप प्रेम भेटलं आणि भाजपसारख्या एका उत्तम संघटनेत काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल मी खूप नशीबवान आहे.
निलेश राणेंच्या ट्विटनंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निलेश राणेंनी हा निर्णय का घेतला याचे कारण अस्पष्ट आहे. निलेश राणे ट्विटने चर्चेने सिंधुदुर्ग जिल्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. निलेश राणेंच्या कोकणातील राजकीय समीकरण पुन्हा एकदा बिघडणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राणेंना पक्षात घेण्यासाठी मोठी खेळी केल्याचे बोलले जात आहे. कोकण आणि राणे असे समीकरण गेल्या काही वर्षात कोकणात पाहायला मिळत आहे.
मी एक लहान माणूस आहे पण राजकरणात खूप काही शिकायला मिळालं आणि काही सहकारी कुटुंब म्हणून कायमचं मनात घर करून गेले, आयुष्यात त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन. निवडणूक लढवणं वगैरे यात मला आता रस राहिला नाही, टीका करणारे टीका करतील पण जिथे मनाला पटत नाही तिथे वेळ स्वतःचा आणि इतरांचा वाया घालवणे मला पटत नाही. कळत नकळत मी काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
कुडाळ तालुक्यातील एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची उमेदवारी जाहीरच करून टाकली होती. ‘कुडाळचे पुढचे आमदार निलेश राणे असतील. तुम्ही त्यांना साथ द्या’, असे थेट आवाहन त्यांनी उपस्थितांना केले होते. या निवडणुकीमुळे निलेश राणे यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याचीही चर्चा होती. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पुन्हा एकवार राणेंची पकड मजबूत झाली असती. परंतु, त्याआधीच निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे.
