राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा मुलगा वैभव गहलोत यांना ईडीने नोटीस पाठवली असून शुक्रवार (२७ ऑक्टोबर) रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे. अशोक गहलोत यांनी स्वत: एक्सवर माहिती देत सांगितलं की, त्यांचा मुलगा वैभव गहलोत यांना ईडीने समन्स पाठवले आहे.
पेपरलीक प्रकरणात ईडी कडून छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे. डोटासरा यांच्या सिकर मधील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. दरम्यान काँग्रेस नेते आरसी चौधरी यांनी भाजप सरकारी संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप केला आहे. गोविंद सिंह डोटासरा यांची राजस्थानमधील काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये गणना होते. गहलोत यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेटमध्ये मंत्री होते. लक्ष्मणगडमधून ते तीनवेळा निवडून आले आहेत.
मुख्यमंत्री गहलोत यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. २५ ऑक्टोबर रोजी काँग्रेसने गॅरंटी जाहीर केल्या आणि २६ रोजी ईडीने गोविंदसिंह डोटासरा यांच्यावर ईडीने छापे टाकले. आपला मुलगा वैभव गहलोत यांना समन्स बजावेल आहेत. यावरून तुम्ही समजू शकता. भाजप ईडीद्वारे हे छापे रोज याच्यासाठी टाकत आहे, कारण काँग्रेसकडून महिला, गोरगरीब आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळू नये. आज पहाटे ईडीने काँग्रेस नेते दोटासराच्या सीकर आणि जयपूर येथील निवासस्थानावर छापे टाकले. एकूण 12 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरू आहे. जयपूरमध्ये तीन आणि सीकरमध्ये दोन ठिकाणी ईडीकडून कारवाई करण्यात येत आहे, तर अपक्ष आमदार हुडला यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीचे पथक पोहोचले आहे.
भाजप नेते किरोडी लाल मीणा यांचे म्हणणे होते की, संचार घोटाळ्यावरून ते ईडीशा बातचीत करणार आहेत. असे म्हटले जात आहे की, ईडीची प्रतिक्रिया यावरून असू शकते. जवळपास चार महिन्यांआधी रीट पेपरवरून या गोष्टीचा दावा करण्यात आला होता की, गोविंद सिंह डोटासरा आणि त्यांचे कुटुंबीय या घोटाळ्यात सहभागी आहे.
