महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. भाजपने केलेल्या ट्विट मुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. भाजपने पुन्हा एकदा केला देवेंद्र फडणवीस यांचा “मी पुन्हा येईन” चा व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होणार अशा चर्चांना आता उधाण आले आहे.
अपात्र आमदारांच्या सुनावणीच्या पार्श्व भूमीवर भाजपकडून हा व्हिडिओ ट्विट केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे भाजपची पुढची भूमिका काय असणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
साधारणतः वर्षभरापासून आमदारांच्या अपत्रेसंदर्भात निकाल येणे अद्याप बाकी आहे. त्यापूर्वीच सोशल मीडियावर हे ट्विट व्हायरल झाल्याने एकच चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार का? हे ट्विट करण्यामागचा नेमका उद्देश काय ? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. राज्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांची जादू चालणार असल्याचे वातावरण निर्माण होऊ लागले असल्याचे आता पहायला मिळणार आहे.
