माझा फडणवीस साहेबांवर पूर्ण विश्वास; निलेश राणे यांची प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर सिंधू दुर्ग मध्ये राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी निवृत्ती माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज पहिल्यांदाच निलेश राणे हे सिंधुदुर्ग येथे आले होते. येथील ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. शक्ती प्रदर्शन करत निलेश राणे यांनी कुडाळ मध्ये प्रवेश केला.

यावेळी निलेश राणे म्हणाले की, माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझ्यासाठी केलं आहे, ते सांगन कठीण आहे. मी आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहीन. मी फडणवीस साहेबांना जेव्हा भेटलो आणि त्यांनी मला जो विश्वास दिला त्यावर मी पुन्हा जोमाने कामाला लागलो आहे. माझा फडणवीस साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. आमची जी चर्चा झाली,त्यामुळे माझं विश्वास शंभर टक्के तसेच होईल. म्हणून मी कामाला लागलेलो आहे. मला जे वाटत होतं ते मी माझ्या नेत्यांना सांगितलेलं आहे. माझा माझ्या नेत्यांवर विश्वास आहे. चर्चेतून मार्ग निघू शकतो या अनुषंगाने कामाला सुरुवात केली असल्याचे राणे म्हणाले आहेत.