सातारकर कुटुंबीयांची खूप मोठी परंपरा वारकरी संप्रदायात राहिली आहे. त्यांची चौथी पिढी या अद्यातमच्या कार्यात आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः आद्यत्म समजेल,असे प्रवचन केले. तीच परंपरा बाबा महाराजांची होती. बाबा महाराज सातारकर यांनी अद्यातमच्या नवीन बदल घडवल्याने नवीन प्रवचनकार ,कीर्तनकार तयार झाले त्यांच्या वाणीत गोडवा होता ,सामान्य माणसाला त्याचे विचार पटेल असे त्याचे प्रवचन होते जनमानसात त्याची वेगळी प्रतिमा आहे, त्यामुळे बाबा महाराज सातारकर यांचे स्मारक राज्य सरकार उभारणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची संत्वणपर भेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली आहे.
यावेळी फडणवीस.म्हणाले की, त्यांच्या स्मारकबाबत मी कुटुंबीयांशी चर्चा केली असून,त्याच्या विचाराचे जिवंत स्मारक व्हायला हवे यासाठी प्रयत्न करू असे फडणवीस यावेळी म्हणालेत.
