संघर्षशील नेते, माजी केंद्रीय मंत्री बबनराव दाजीबा ढाकणे यांचे रात्री रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा प्रताप ढाकणे, सून व नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवारी दुपारी त्यांच्या मूळ गावी पागोरी पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बबनराव ढाकणे गेले काही दिवसांपासून न्यूमोनियाने आजारी होते. त्यामुळे त्यांना नगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.
माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बबनराव ढाकणे हे चार वेळा आमदार आणि एक वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं.
मागील 12 दिवसांपासून न्युमोनिया आजारावर ते उपचार घेत होते. मात्र सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंदसेवा वसतिगृहामध्ये आज दुपरी एक ते उद्या दुपारी एक वाजेपर्यंत अंतदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी दोन वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. याआधी त्यांनी गोवा मुक्तिसंग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये उर्जा संसाधनमंत्री होते.
बबनराव ढाकणे हे सामान्य शेतकरी कुटुंबातले पाथर्डीतील पागोरी पिंपळगावमधील सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.त्यांच्या घरात राजकीय वारसा नव्हता. पाथर्डीतील हिंद वसतिगृहात राहून त्यांनी शिक्षण घेतलं. नानासाहेब गोरे, सेनापती बापट, शिरू लिमये यांच्या नेतृत्वातील गोवा मुक्ती संग्रामातही बबनराव ढाकणे यांचा सक्रीय सहभाग होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडे ते ओढले गेले. 1958 साली यशवंतराव चव्हाण हे भगवानगडावर आले होते. तेव्हा बाशासाहेब भारदे आणि निऱ्हाळी यांची यांनी त्यांचा परिचय करून दिला अन् बबनराव ढाकणे काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.
