राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या राजकीय डावपेचांसाठी ओळखले जातात. तेवढेच ते त्यांच्या संवेदनशीलपणासाठी ओळखले जातात. नेता असूनही छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याला लक्षात ठेवणे आणि त्यांना मदत करणे, हा त्यांचा एक महत्त्वाचा गुण. विरोधकांवर तुटून पडताना त्यांच्यातील आक्रमक नेता दिसतो. तर, प्रसंगी गरीब शेतकऱ्यांची जमीन लुबाडणाऱ्या सावकाराकडून त्यांची जमीन परत मिळवून देणारे संवेदनशील उपमुख्यमंत्री दिसतात. भाजपा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांच्या अडचणीतही अनेकदा त्यांचा थेट सहभाग दिसतो. असाच एक प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी यांनी स्वतःच सांगितला आहे. यात देवेंद्र फडणवीसांमुळे ‘वेदांत ठाकरे’चा आजार बरा झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राहणारा वेदांत ठाकरे… या 13 वर्षाच्या मुलाने जणू मोठी अग्निपरीक्षाच पास केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एवढ्या लहान वयात मृत्यूला परतवून लावणाऱ्या वेदांतचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. वेदांतच्या या खडतर प्रवासात त्याला साथ लाभली ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांची.. देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशीलतेमुळे ‘वेदांत ठाकरे’ हा थॅलेसेमिया सारख्या दुर्गम आजारावर मात करणारा ‘सुपर हिरो’ ठरलाय. वेदांतने या गंभीर आजारावर यशस्वी मात केली असून, त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत खुद्द फडणवीस यांनी ट्विट करत वेदांतचं भरभरून कौतुकही केलंय.
काही महिन्यांपूर्वी वेदांतच्या पालकांनी एका भाजप कार्यकर्त्यामार्फत मला संपर्क केला. थॅलेसेमियामुळे वेदांतवर उद्भवलेली कठीण व गंभीर परिस्थिती त्यांनी मांडली. माझ्या कार्यालयाने प्रयत्न केले. वेदांतवर मुंबईत उपचार सुरु झाला. या आजाराचा उपचार म्हणजे जणू एक कठीण परीक्षाच ! पण वेदांत हिमतीने पुढे गेला. आज थॅलेसेमिया सारख्या गंभीर आजारावर मात केलेल्या वेदांतने कुटुंबासमवेत माझ्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली,” असा प्रसंग देवेंद्र फडणवीसांनी उलगडला. वेंदात ठाकरेंना बरं करण्यात फडणवीसांनी मोलाची भूमिका निभावली.
थॅलेसेमियाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रक्त आणि औषधे आवश्यक असतात. या कारणास्तव, प्रत्येकजण त्यावर उपचार करण्यास सक्षम नसतो, भविष्यात हा आजार मुलाच्या जीवनासाठी धोका ठरू शकते. जसजसे वय वाढते तसतशी रक्ताची गरजही वाढते.
-विवाहापूर्वी स्त्री आणि पुरुष दोघांची रक्त तपासणी करून घेणे आवश्यक
-गर्भधारणेदरम्यान याची तपासणी करा.
-रुग्णाचे हिमोग्लोबिन 11 किंवा 12 राखण्याचा प्रयत्न करा.
-वेळेवर औषधे घ्या आणि उपचार पूर्ण करा.
