उत्साहात पार पडला भारतरत्न पुरस्कार प्रदान सोहळा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी चार व्यक्तींना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, पी.व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ. एमएस स्वामीनाथन. राष्ट्रपतींनी चार व्यक्तींच्या कुटुंबीयांना हा सन्मान दिला.

भारतरत्न देण्यात येणाऱ्या पाच व्यक्तिमत्त्वांमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी वगळता इतर चार- माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि पीव्ही नरसिंह राव , प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा समावेश आहे. या चौघांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान केला जाणार आहे. पीआयबी इंडियाने याबाबत आपल्या ट्विटर हँडलवर माहिती दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून ३१ मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वीच पोस्ट केले होते की, आज हे सांगण्यास आनंद होत आहे की, आपले माजी पंतप्रधान दिवंगत पी.व्ही. नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांनी एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून, नरसिंह राव गरू यांनी विविध पदांवर भारताची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कार्यासाठी ते तितकेच स्मरणात आहेत. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाची समृद्धी आणि विकास यांचा भक्कम पाया रचण्यात मोलाचा वाटा उचलला.

राष्ट्रपती भवनातीलच दरबार हॉलमध्ये शनिवारी भारतरत्न पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक बडे नेते आणि व्यक्तिमत्त्व या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

१९५४ मध्ये भारतरत्न फक्त जिवंत व्यक्तीलाच देण्यात आला होता. यात १९५५ मध्ये सुधारणा करण्यात आली आणि मरणोत्तर भारतरत्न देण्यास सुरूवात झाली. तसेच वर्षभरात फक्त तीन व्यक्तींना भारतरत्न दिला जात असे. पण नंतर यात बदल होत गेले. वर्षभरात चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आले आहेत. तर २०१४ मध्ये अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांचा मोदींच्या कार्यकाळात भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर आता २०२४ मध्ये ५ जनांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहेत. तर आतापर्यंत हा सन्मान मिळविणाऱ्यांची संख्या ५३ वर पोहोचली आहे.