‘काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार’; अनिल देशमुखांच्या गौप्यस्फोटावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर

शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनिल देशमुख राज्याचे गृहमंत्री होते. पण त्यांच्यावर तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावं लागलं. याशिवाय अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने कठोर कारवाई केली. या सर्व घडामोडींनंतर अनिल देशमुख यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मंजूर झालाय. आपल्या कोणत्या परिस्थितीत जावं लागलं, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यासाशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत. बरंच सत्य हे माझ्याजवळ आहे. योग्य वेळी मी ते बाहेर काढेल. आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सणसणी पसरवायची आहे. मात्र ज्यावेळेस मी सत्य बाहेर काढेल त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल. त्यामुळे याच्यावर जास्त काही मी बोलत नाही.

काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेलच

खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे. त्या घटनेमध्ये हे सरकारमध्ये होते. त्यांचं सरकार त्या ठिकाणी होतं. त्यांच्याच काळात सगळा तो फॉर्मचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला. त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले? या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. काळजी करू नका, योग्यवेळी मी सत्य बाहेर काढेलच, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

नरेंद्र मोदी हे कधीच बाळसाहेब ठाकरे यांचा अपमान करूच शकत नाहीत

नरेंद्र मोदी हे कधीच बाळसाहेब ठाकरे यांचा अपमान करूच शकत नाहीत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढासळला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला फडणवीसांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मोदीजी कधी बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करूच शकत नाहीत. त्यांनी वारंवार सांगितलयं की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरिता आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञाची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की त्यांना तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांकडे नेलं पाहिजे, ‘ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप केला. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत. भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने आणि शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत. ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांदे यांच्यात काही डिफरन्स आहेत ते आम्ही दूर करू, असं त्यांनी म्हटलंय.