भारतीय लष्करामधून निवृत्त झालेले कर्नल वैभव अनिल काळे यांचं गाझामधील एका हल्ल्यात मृत्यू झालाआहे. वैभव काळे हे मूळचे नागपुरमधील लक्ष्मीनगर येथील रहिवाशी होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून वैभव काळे कार्यरत होते. मागील वर्षी गाझामध्ये युद्धाला सुरुवात झाल्यापासून आंतरराष्ट्रीय संस्थेच्या एखाद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना असल्याचं अनेक वृत्तसंस्थांनी म्हटलं आहे. वैभव काळे हे जुलै 2022 मध्ये भारतीय लष्कारमधून निवृत्त होऊन संयुक्त राष्ट्रांसाठी काम करत होते. ते 46 वर्षांचे होते.
संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अंतोनिओ गुटेरेस यांनी या हल्ल्याची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.कर्नल वैभव काळे हे मूळचे नागपूरचे होते. भारतीय लष्करातून सन 2022 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांनी ‘११ जम्मू-काश्मीर रायफल्स’मधून विविध आघाड्यांवर बजावली होती. दोनच महिन्यांपूर्वी ते संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात रुजू झाले होते.
भारतीय लष्करामधून 2022 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर वैभव काळे हे त्यांच्या कुटुंबासहित पुण्यात स्थायिक झाले होते. पुण्यामध्ये त्यांनी दोन खासगी कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती. या कंपन्यांमध्ये ते सुरक्षेसंदर्भातील उच्च पदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत होते. मात्र नंतर मानव सेवा करण्याच्या उद्देशाने वैभव काळेंनी संयुक्त राष्ट्रांत काम करण्यास पंसती दिली होती. लोकांच्या आयुष्यात आपण काहीतरी बदल घडवणारं काम करावं असं त्यांना फार वाटायचं. त्यामुळेच त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा आणि संरक्षण विभागात ‘संरक्षण समन्वय अधिकारी’ म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला होता.
कर्नल वैभव काळे मुळचे नागपूरचे होते. एप्रिल 2004 मध्ये भारतीय लष्करी सेवेत रुजू झाले होते. संयुक्त राष्ट्रांत त्यांनी 2009 ते 2010 दरम्यान सेवा दिली होती. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बीए पदवी घेतली होती. त्यानंतर वर्तनशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचीही पदवी त्यांनी घेतली होती. सन 2022 मध्ये त्यांनी भारतीय सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. यानंतर ते कुटुंबासह पुण्यात स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
