पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात, दोन सभा आणि रोड शोचं आयोजन

लोकसभा निवडणुकीत आत्तापर्यंत ४ टप्प्यात राज्यासह देशभरात मतदान पार पडले. पाचव्या टप्प्यासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे पाचव्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. राज्यात दोन ठिकाणी मोदींच्या सभा होणार आहेत. दिंडोरी आणि कल्याण येथे त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात लोकसभेच्या १३ जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबईतील ६ मतदारसंघाचा समावेश आहे. याशिवाय कल्याण, ठाणे, भिवंडी, नाशिक, दिंडोरी धुळे आणि पालघर या मतदारसंघातही मतदान होणार आहे. २ दिवस आधी म्हणजे १८ मे रोजी या टप्प्याच्या प्रचाराची सांगता होणार असल्याने राजकीय पक्षांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत चारही टप्प्यातील प्रचाराला मोदींनी हजेरी लावून अनेक ठिकाणी सभा घेतल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीच्या पुढील व शेवटच्यातील मतदांन महाराष्ट्रातील काही जागांवर मतदान होणार आहे. हे मतदान २० मे रोजी होणार आहे. मुंबईतील सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे आणि पालघर या मतदारसंघात हे मतदान होणार आहे. तर प्रचाराची सांगता ही १८ मे रोजी होणार आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे आणि अपक्ष उमेदवार हे प्रचारात व्यस्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरात जनसभांना संबोधित करून अनेकविध ठिकाणी रोड शो, रॅली करत असीब पाचव्या टप्प्यातील मतदाना पूर्वी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो होणार आहे. तसेच कल्याणमध्ये सभा घेण्यात येणार आहे. पंतप्रधान यांच्या बंदोबस्तसाठी पोलिसांचा मोठा फोजफाट्यासह 11 बॉम्ब शोधक व बॉम्ब नाशक पथक तैनात केले आहे. मोदी यांचा घाटकोपर येथे रोड शो होणार आहे. साडे सहा वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा ६.४५ मिनिटांनी सुरू होऊन तो ७.४५ ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.