बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून झडती घेण्यात आली. या झाडाझडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड त्यासोबत 970 ग्रॅम सोने व पाच किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत. एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर हे फरार झाले आहेत.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी हरिभाऊ खाडे यांच्या घराची झाडाझडती सुरु केली तेव्हा एक-एक करुन मुद्देमाल सापडत गेला. यावेळी एका बॅगेत 500 च्या नोटांची बंडलं आढळून आली. हे सर्व पैसे मोजण्यासाठी एसीबीच्या अधिकाऱ्यांना मशीनचा वापर करावा लागला. यावेळी खाडे यांच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत.

बीड येथील जिजाऊ मल्टीस्टेटमध्ये काही दिवसांपूर्वी घोटाळा झाला होता. या प्रकरणात गुन्हे दाखल झाल्यानंतर याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. यामध्ये एका व्यापाऱ्याच्या खात्यावर 60 लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली होती. त्याच्यासह त्याच्या दुसऱ्या सहकार्यास आरोपी न करण्यासाठी पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि हवालदार जाधव यांनी एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तडजोडी अंती 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते.
15 मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार खाडे यांच्याकडे गेला होता. यावर खाडे याने आपण पुण्याला आलो असून जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. जैनने पैसे स्विकारताच एसीबीने त्याला पकडले. त्यानंतर खाडे आणि हवालदार जाधवर यांचा शोध सुरू केला. उपअधीक्षक शंकर शिंदे, भारत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, हनुमंत गोरे, सुरेश सांगळे आणि अंबादास पुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.