इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणची सेमी-अधिकृत वृत्तसंस्था मेहरने ही घोषणा केली. त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित असलेले परराष्ट्र मंत्री हुसेन अमीराबदुल्लाहियान यांच्या मृत्यूची माहितीही देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या हेलिकॉप्टरचे अवशेष अझरबैजानच्या टेकड्यांमध्ये सापडला होते. यामध्ये अध्यक्ष रईसी यांच्यासह 9 जण होते.

काल संध्याकाळी या हेलिकॉप्टरचा हार्ड लँडिंग झाल्याच कळलं. हेलिकॉप्टरशी संपर्क होत नव्हता. खराब हवामानामुळे बचाव पथकाला हेलिकॉप्टरचा शोध लावण्यात अनेक अडचणी येत होत्या. इराणी मीडिया रेड क्रिसेंटनुसार, बचाव पथकाला दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर सापडलं आहे. क्रॅश साइटवरुन फोटो समोर आलेत. या भीषण अपघातातून कोणी वाचण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. इराणच्या सरकारी टेलीविजनने सोमवार सांगितलं की, राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि अन्य अधिकारी असलेल्या या हेलिकॉप्टरमध्ये कोणी जिवंत असण्याचे संकेत नाहीत.

राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मलेक रहमती, तबरीझची शुक्रवारची नमाज इमाम मोहम्मद अली अलेहाशेम, वैमानिक, सहपायलट, क्रू चीफ, सुरक्षा प्रमुख, आणि आणखी एक अंगरक्षक होते.

रविवारी या दुर्घटनेच्या वृत्तानंतर इराणच्या लष्कराच्या चीफ ऑफ स्टाफने सर्व लष्कर आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या बचाव पथकाने शोध आणि बचाव कार्य राबवले. सोमवारी पहाटे सोशल मीडियावर अनेक दृश्यांमध्ये चमकदार जॅकेट आणि डोक्याची टॉर्च परिधान केलेले बचाव पथक जीपीएस डिव्हाइसच्या साह्याने बर्फवृष्टीत पायी चालत अपघातस्थळाचा शोध घेतांना दिसत होते.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर जारी केलेल्या संदेशात म्हटले आहे – इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या बातमीने मी चिंतेत आहे. या कठीण काळात आम्ही इराणसोबत आहोत.