लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज दि. २० मे २०२४ रोजी सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाली. राज्यातील १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६.३३ टक्के मतदान झाले आहे. भिवंडीत सर्वात कमी (४.८६ टक्के) मतदानाची नोंद झाली आहे. तर पालघरमध्ये सर्वाधिक (७.९५ टक्के) मतदान झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील किसननगर येथील २५५ मतदान केंद्रावर कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा व कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.
पाचव्या टप्प्यातील एकूण १३ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
धुळे- ६.९२ टक्के
दिंडोरी- ६.४० टक्के
नाशिक – ६.४५ टक्के
पालघर- ७.९५ टक्के
भिवंडी- ४.८६ टक्के
कल्याण – ५.३९ टक्के
ठाणे – ५.६७ टक्के
मुंबई उत्तर – ६.१९ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – ६.८७ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – ६.८३ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – ६.०१ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- ७.७९ टक्के
मुंबई दक्षिण – ५.३४ टक्के
