‘तेच ते आपलं घीसापीटा वाक्य’, मतदानानंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आज पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. दरम्यान, राजकीय, क्रिडा आणि अभिनय क्षेत्रापासून सर्व सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण मतदानाचा हक्क बजावत आहेत. याच पार्श्वभमूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लोकसभा निवडणूक २०२४ साठी मतदान केले. यावेळीही राज ठाकरेंच्या पक्षाचा एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही. गेल्या निवडणुकीत भाजपविरोधात थेट भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी यंदा महायुतीला पाठिंबा दिला. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या.

मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला राज ठाकरेंनी खास आपल्या शैलीत उत्तर दिली. राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात पहिल्या तास दोन तासांमध्ये म्हणजेच सकाळी ७ ते ९ या वेळेत सरासरी ६.३३ टक्के मतदान झालं आहे. मतदानाचा टक्का वाढायला हवा. सध्या ऊन जास्त आहे. मतदार बाहेर पडतील आणि त्यांचा हक्क बजावतील, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काय आवाहन कराल, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर काही नाही तेच आपलं घिसंपिटं वाक्य, मतदानाचा हक्क बजवा, असं मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिलं.

मुंबईकरांना काय आवाहन कराल? “तेच ते आपलं घीसापीटा वाक्य, मतदानाचा हक्क बजावा. तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात मतदान करतील. ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालाय, असा तरुण वर्ग मतदानाला येईल. काहींच्या आशा संपल्या आहेत, त्यांच्याकडून मतदानाची अपेक्षाच करु नका” महिला मतदार टर्निंग पॉइंट ठरतील का? तुम्हाला काय वाटतं? ‘मी काही ज्योतिषी, भविष्यवेत्ता नाही असं खास ठाकरी शैलीतल उत्तर दिलं’.

उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान

उद्धव ठाकरेंनी वांद्रे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून उज्वल निकम निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उद्धव ठाकरेंच्या मतदानानंतर ठाकरेंनी पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंजाला मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.