लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात एनडीएच सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींची ही हॅटट्रिक असून हा शपथविधी भव्य व्हावा यासाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, चित्रपटसृष्टीतील स्टार्स, मोठमोठ उद्योगपती यांच्यासह शेजारील राष्ट्रांचे प्रमुख नेते आणि जगातीलही प्रमुख नेत्यांना निमंत्रण धाडण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांच्या या शपथविधी समारंफभासाठी बांग्लादेश, श्रीलंका, भूटान, नेपाल आणि मॉरीशस या राष्ट्रांचे पंतप्रधान / राष्ट्रपती यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, असे राष्ट्रपती कार्यालयाच्या मीडिया विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
एनडीएने सर्वानुमते नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड केली आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी 8 जूनला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. हा सोहळा दिल्ली येथे होणार आहे. बुधवारी दिल्लीत एनडीएमध्ये समाविष्ट पक्षांच्या प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत सरकार स्थापनेवर चर्चा झाली.दरम्यान शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाने काही पावल उचलली आहेत. 9 जूनपर्यंत राष्ट्रपती भवन सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहे. शपथविधी झाल्यानंतरच राष्ट्रपती भवन खुले केले जाणार आहे.
विक्रमसिंघे आणि हसीना या दोघांनीही पंतप्रधान मोदींनी दिलेले निमंत्रण स्वीकारलं आहे. 4 जून रोजी भारताच्या 18व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. नवीन सरकारच्या शपथविधीपर्यंत ते सध्याचे कार्यवाहक पंतप्रधान राहतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांना तसेच नेपाळ आणि मॉरिशस, श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि भूतानचे राजा यांना या आठवड्याच्या अखेरीस त्यांच्या शपथविधीसाठी निमंत्रित केलं आहे. याशिवाय श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि भूतानचे राजा ड्रुक ग्याल्पो जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया यांनी देखील ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्या म्हणाल्या कि, “नरेंद्र मोदी यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते. तसेच त्यांना पुढील भविष्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मला विश्वास आहे की इटली आणि भारत यांच्यातील मैत्री दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करत राहू.”
