विशेष प्रतिनिधी
परभणी : अर्थसंकल्प ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावं, अर्थसंकल्प कसा वाचावा हे पुस्तक मी लिहिलेला आहे, ते पुस्तक मी त्यांना देईन, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप करणाऱ्यांना लगावला. ( Those who dont understand the budget should come to me says Devendra Fadnavis)
‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक आरोप-प्रत्यारोप करत असतात. सध्या ही योजना निधीवरुन चर्चेत आहे. या योजनेसाठी शासनाच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने होत असेत. काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी व न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळल्याचे सांगितले जात होते. आता, या योजनेसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा ३३५ कोटी ७० लाखांचा निधी वर्ग करण्यात आल्याचा आरोप होत आहे. यावर विरोधकांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, लाडक्या बहिण योजनेसाठी निधी वळल्याचा आरोप अतिशय चुकीचा आणि खोटा आहे. अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना कळत नाही, तेच अशाप्रकारे आरोप करतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे. या विभागांचं बजेट पावणे दोन पटींनी वाढलं आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही.
राज्यामधील शेतकऱ्यांकडून वेगवेगळे प्रयोग केले जातात. शेतकरी अत्यंत महत्त्वाचे संशोधन करतात, त्यांना प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. ज्या शेतकऱ्यांनी उत्कृष्ट प्रयोग केले त्या शेतकऱ्यांना कृषी शास्त्रज्ञ म्हणून पुरस्कार द्यावेत, असा विचारही विद्यापीठांपुढे मांडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे
