दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही; विचार देखील नाही, सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की, दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत कुठलाही प्रस्ताव पक्षाच्या समोर आलेला नाही, आणि त्या दिशेने कोणताही विचारही करण्यात आलेला नाही. “आम्ही सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहोत आणि एनडीएमध्येच राहणार आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
( There is no proposal for merger of both NCPsnot even a thought explains Sunil Tatkare)

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यांनी स्पष्ट केले की, “ज्यांना आमची भूमिका मान्य असेल आणि जे आमच्यासोबत एनडीएमध्ये यायला इच्छुक असतील, त्यांचे स्वागत आहे. मात्र याचा अर्थ विलिनीकरण अजिबात होत नाही.”

ते पुढे म्हणाले, “आज आमच्या पातळीवर अशा कुठल्याही प्रस्तावाची चर्चा नाही. जेव्हा कुठलाही प्रस्ताव समोर येईल, तेव्हा त्यावर विचार केला जाईल. पण जे अस्तित्वातच नाही, त्यावर भाष्य करण्यात काहीच अर्थ नाही.” तटकरे यांनी असेही नमूद केले की, “आज आम्ही आमच्या मूळ विचारसरणीशी एकनिष्ठ राहून एनडीएमध्ये सहभागी आहोत आणि आमचा पुढील राजकीय प्रवास नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.”

लोकसभा निवडणुकीनंतर आमच्या स्थैर्याबाबत प्रश्न निर्माण होतो का, यावर तटकरे म्हणाले, “राज्याच्या जनतेने त्या प्रश्नांची उत्तरे मतदानाच्या माध्यमातून दिली आहेत. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून जर-तरच्या आधारावर बोलणे उचित ठरणार नाही.”

तटकरे यांनी हसतहसत टोला लगावला की, “सध्या माध्यमांमध्ये सूत्रांच्या बातम्या येत आहेत, पण आता ती सूत्रे आम्हालाच शोधावी