धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरलेल्या ठाकरे गटाला बाळासाहेबांच्या विचारांचा विसर, म्हणून प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा राग!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डाव्या विचारांच्या कम्युनिस्टांचा कायम विरोध केला. त्यांच्याशी संघर्ष केला. मात्र धर्मनिरपेक्षतेची झुल पांघरलेल्या ठाकरे गटाने या विचाराला आता तिलांजली दिली आहे. त्यामुळे विधान परिषदेत प्रसाद लाड यांनी कौतुकाने बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केल्यानंतर ठाकरे गटाने गोंधळ घालत सभात्याग केला.
( The Thackeray groupwhich is shrouded in the veil of secularism has forgotten Balasahebs thoughtshence the anger over Prasad Lads statement!)

राष्ट्र विघातक डाव्या कडव्या विचारांनी तरुणाई प्रभावित होऊन ती नक्षलवादाकडे वळण्याचा धोका रोखण्यासाठी, देशाच्या संविधानाला झुगारणाऱ्या घातक नक्षल विचारांना पायबंद बसावा म्हणून महाराष्ट्र सरकारने विशेष जनसुरक्षा विधेयक आणले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचाही हाच विचार होता. त्यामुळे त्यांनी मुंबईमध्ये त्याकाळी बलाढ्य असलेल्या कम्युनिस्टांशी संघर्ष केला होता. शिवसेना पक्षाची उभारणी करताना त्यांना कम्युनिस्ट विचारांच्या विरोधात लढावे लागले होते. त्यासाठी त्यांनी प्राणाची बाजी लावली. हात सगळा संदर्भ देऊन जन सुरक्षा विधेयकावर बोलताना भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही विचारधारा मारून शिवसेना स्थापन केली होती. मात्र या वाक्याने ठाकरे गटाला मिरची लागली.

बाळासाहेब ठाकरे यांनी डाव्या विचारांविरुद्ध अगदी शिवसेनेच्या जन्मापासून लढा दिला. 1966 रोजी शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला. यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्ट लोकांवर जोरदारपणे हल्ला केला. कम्युनिस्ट पक्षाचे मुख्यालय परळच्या दळवी इमारतीत होते. डिसेंबर 1967 मध्ये शिवसेनेने इमारतीवर हल्ला करून भयंकर तोडफोड केली. कामगारांना बेदम मारहाण करण्यात आली. काही मित्रांची कार्यालये आहेत, अन्यथा इमारत जाळण्याचा हेतू होता, असे बाळासाहेबांनी सांगितले होते. म्हणाले.

कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई यांच्या खून प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. त्यासाठी बाळासाहेबांच्या तीन निकटवर्ती शिवसैनिकांना शिक्षाही झाली होती. दिलीप हाटे, अशोक कुलकर्णी आणि विश्वनाथ खटाटे यांना 14 वर्षांची शिक्षा झाली होती. यातीलच विश्वनाथ खटाटेंनी डीएनए वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना, सांगितले होते की, “1970 मधल्या राजकीय स्थितीची मला पूर्ण कल्पना होती. मात्र, कृष्णा देसाईला आम्ही बाजूला केलं नसतं, तर त्यांनं साहेबांना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांना मारलं असतं.”
देसाई यांच्या हत्येमागे शिवसेनेचा हात असल्याची चर्चा नेहमीच दबक्या आवाजात होते. देसाई यांच्या अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमीत झालेल्या भाषणांत अनेक वक्त्यांनी थेट आरोपच केला.प्रकाश अकोलकर यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, मराठा दैनिकाचा आठ कॉलमी मथळा होता – ‘कॉ. कृष्णाचे खरे खुनी बाळ ठाकरे आणि वसंतराव नाईक’स्मशानभूमीत झालेल्या सभेत अनेक नेत्यांनी शिवसेनेचं नाव घेऊन आरोप आणि टीका केली. कॉ. कोल्हटकर तर भाषणात म्हणाले की, ‘हा हिंदू, तो मुस्लीम, हा मराठी, तो बिगरमराठी अशी वर्ग विसरायला लावणारी आणि हिटलरचा उघड उघड पाठपुरावा करायला लावणारी शक्तीच या हल्ल्यामागे आहे.’ बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेवर सगळ्यांचा रोख होता.

स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी याबाबत म्हटले होते की “कृष्णा देसाई मला ठार करायला निघाला होता. कृष्णा देसाई खुनी होता. आमचे नाईक मास्तर त्याने मारले.”

बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांच्या विरोधात केलेल्या संघर्षाचा हा सगळा इतिहास असताना उद्धव ठाकरे यांना मात्र तो मान्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच प्रसाद लाड यांनी दिलेल्या संदर्भामुळे ठाकरे गट चिडला.