प्रफुल लोढाविरुद्ध पुण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल, कोथरूडमधील 36 वर्षीय विवाहित महिलेची तक्रार

विशेष प्रतिनिधी

पुणे : राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेल्या प्रफुल लोढाविरुद्ध पुण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बावधन पोलिस ठाण्यात कोथरूड येथे राहणाऱ्या 36 वर्षीय विवाहित महिलेने लोढाविरुद्ध बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली आहे. (Another rape case registered against Praful Lodha in Pune complaint filed by 36-year-old married woman from Kothrud)
कोथरूडमध्ये राहणाऱ्या एका 36 वर्षीय विवाहित महिलेने बावधन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, लोढाने तिच्या पतीला नोकरी देण्याचे आमिष दाखवून 27 मे रोजी रात्री बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे तिला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमकावले. विरोध केल्यावर तिच्या नोकरीवर गदा आणण्याची धमकी देत जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्या महिलेने केला आहे.

प्रफुल्ल लोढावर यापूर्वी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यांमध्ये अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार, धमकी आणि ‘हनी ट्रॅप’ प्रकाराचा आरोप होता. संबंधित प्रकरणांमध्ये त्याच्यावर पोक्सो कायद्यासह बलात्कार, फसवणूक, खंडणी यांसारखे गुन्हे दाखल झाले आहेत. साकीनाका पोलिसांनी त्याला 5 जुलै रोजी अटक केली होती आणि तो सध्या मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *