विशेष प्रतिनिधी
पुणे : नेहरू रस्त्यावरील रुफ टॉप हॉटेल ‘अल डीनेरो’मध्ये बेकायदेशीर हुक्का बार चालविल्या प्रकरणी हॉटेल चालकासह एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलिसांनी ही कारवाई केली. ( Illegal hookah bar at rooftop hotelAl Dinero)
दीपक सतभूषण जैन (वय ४३, रा. म्हाडा बिल्डिंग, महर्षी नगर) मासोद अफसर मुल्ला (वय २३), युवराज लक्ष्मण परिहार (वय २०) आणि हॉटेल मालक प्रतीक विकास मेहता (वय ३३, रा. चव्हाण नगर, धनकवडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार अमोल जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मोदी प्लाझा बिल्डिंगमधील ‘अल डीनेरो’ या हॉटेलमध्ये घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवनलव्हज चौकामधील मोदी प्लाझा बिल्डींगमध्ये ‘अल डीनेरो’ या नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आरोपींनी तंबाखूजन्य हक्क फ्लेवर व त्यासाठी लागणारे हुक्का साहित्य ठेवून या ठिकाणी बेकायदा हुक्का पार्लर चालवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि कारवाई करीत साहित्य जप्त केले आहे. पुढील तपास स्वारगेट पोलिसांकडून सुरू आहे.
