विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : काँग्रेसवर आसाममध्ये बेकायदेशीर घुसखोरीला प्रोत्साहन दिले. सीमावर्ती भागातील लोकसंख्येचे संतुलन बिघडवण्याचा कट रचला. हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, असा आराेप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
( Supporting infiltration in Assam conspiring to upset demographic balancePrime Minister Narendra Modi attacks Congress)
पंतप्रधान मोदी यांनी दररांग जिल्ह्यातील मंगालदोई आणि गोलाघाट जिल्ह्यातील सभांमध्ये बाेलत हाेते. या दौऱ्यात त्यांनी आरोग्य, ऊर्जा व संपर्क क्षेत्रातील तब्बल ₹18,530 कोटींच्या प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन केले. काँग्रेसवर घणाघाती टीका करताना
मोदी म्हणाले की, “काँग्रेसने आसामच्या विकासाकडे आणि लाचित बोरफुकन, भूपेन हजारिका यांसारख्या महानायकांकडे दुर्लक्ष केले. भाजपच्या डबल इंजिन सरकारने या चुकांची दुरुस्ती सुरू केली आहे. काँग्रेसने घुसखोरांच्या मदतीने सीमावर्ती भागांचे लोकसंख्यात्मक संतुलन बदलण्याचा कट रचला. मात्र, शेतकरी, आदिवासी व तरुणांचे हक्क कोणीही हिरावून घेऊ शकणार नाहीत.
काँग्रेस पाकिस्तानसोबत उभी राहिली, दहशतवादी हल्ल्यांवर मौन बाळगले, अगदी आपल्या लष्कराच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले, असा आराेप करताना माेदी म्हणाले, काँग्रेसने नेहमीच एका वर्गाला खुश करण्याचे राजकारण केले. गरीब जनतेला त्रास दिला, अपमानित केले. भाजप तुष्टीकरणाचे नव्हे तर समाधानाचे राजकारण करते. मला कितीही शिव्या दिल्या तरी मी भगवान शिवाचा भक्त असल्याने ते सगळे विष पचवतो. पण ‘भूपेन दा’ चा अपमान सहन करणार नाही .
दररांग येथे मोदींनी 118.5 किमी लांबीच्या गुवाहाटी रिंग रोड प्रकल्पाचे, ब्रह्मपुत्रा नदीवरील 2.9 किमी पुलाचे आणि 430 खाटांचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे भूमिपूजन केले. नुमालीगढ येथे त्यांनी जगातील पहिले बांबूपासून इंधन तयार करणारे द्वितीय पिढीचे बायो-एथेनॉल प्रकल्प उद्घाटन केले. तसेच 360 KTPA क्षमतेचा पॉलीप्रॉपिलीन प्रकल्पाचाही पाया रचला.
