पूरपरिस्थितीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

लोणी काळभोर : थेऊर येथे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( A case has been registered against Dr. D. Y. Patil University Vice Chancellor Dr. P. D. Patil for causing the flood situation.)

ओढे, नाले, मोऱ्या बुजवून नैसर्गिक स्त्रोत कायमस्वरूपी बंद केल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे महसूल विभागाच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रसादराव दत्ताजीराव पाटील उर्फ पी. डी. पाटील, दिलीप कुंजीर, दत्तात्रय महादेव चव्हाण, सुषमा महेश थोरात (सर्व रा. थेऊर ता. हवेली, जि. पुणे), यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ग्राम महसूल अधिकारी अर्जुन नागनाथ स्वामी यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यांवरून दाखल करण्यात आला आहे. कोलवडी (ता. हवेली) येथे थेऊर फाटा ते थेऊर रस्त्यावरील कांबळे वस्ती व रुकेवस्ती परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पी. डी. पाटील यांनी थेऊर ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर – नायगांव रस्त्यावर ओढ्यालगत गट नंबर ६३ मध्ये दलदल असल्याने क्षेत्रालगत संरक्षण भिंत बांधली आहे. त्यामुळे ओढ्याचे पात्र अरुंद झाले आहे. झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याचे पाणी अडले. पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला परिणामी सदर पाणी नजीकच्या फुड कंपनीत, प्राथमिक शाळेत, रहिवासी इमारतीत व गोठ्यात शिरले. यामुळे अनेक शेळ्या, मेंढ्या वाहून गेल्या. पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात साचले होते की रहिवासी इमारतीतील रहिवाशांना दुसऱ्या मजल्यावर जाऊन थांबावे लागले. पहिल्या मजल्यावर असलेल्या गृहोपयोगी वस्तू, टिव्ही, फ्रिज, मिक्सर सारखी विद्यूत उपकरणे खराब झाली.
गोविंद उत्तमचंदानी व राजेश उत्तमचंदानी या दोघांनी थेऊर येथील गट नंबर ६६३ मध्ये जमीन खरेदी केली होती. त्यांनी ओढ्याचे पात्र बुजवुन त्यावर अनाधिकृत प्लॉटींग केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *