ड्रोनच्या सहाय्याने नुकसानीचे पंचनामे होणार, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजित पवार यांचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी
सोलापूर : पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देताना ६५ मिमी पावसाची अट ठेवणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. ( Damage assessment will be done with the help of drones Ajit Pawar assures farmers affected by heavy rains)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बुधवारी सकाळीच अजित पवार सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले. करमाळा तालुक्यातील कोरटी येथे त्यांनी पाहणी केली शेतकऱ्यांकडून कांदा आणि इतर पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सर्व आम्ही करू. आधी आम्ही पाहणी करत आहोत आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.
पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत पोहोचवण्यासाठी प्रशासनानं काटेकोर नियोजन करून आवश्यक ती उपाययोजना त्वरित राबवावी, असे स्पष्ट निर्देश दिले. शेतकरी बांधवांच्या पाठीशी आपलं सरकार खंबीरपणे उभं आहे.
मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी मोठी अतिवृष्टी झाली आहे. अनेक जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *