काळेपडळ तपास पथकाने घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याला ठोकल्या बेड्या

विशेष प्रतिनिधी

लोणी काळभोर : काळेपडळ तपास पथकाने घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्यांस जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांचेकडून ९ लाख २२ रुपये किंमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ( The Kalepadal investigation team arrested a burglar who fled after breaking into a house.)

काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी मुस्तफा शकील अन्सारी (वय ४१, रा. सर्वे नं.४२, जवाहरगंज, कोंढवा, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी की काळेपडळ पोलीस ठाण्याचे हद्दीत दाखल गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे कामी काळेपडळ तपास पथकातील अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, नितीन ढोले, महादेव शिंदे हे पोलीस ठाण्याचे हद्दीतील घरफोडी झालेल्या ठिकाणी भेट देवून दाखल गुन्हयात चोरी करणारे अज्ञात चोरटयाचा शोध घेत होते.
घटनास्थळी असलेल्या फ्लॅटमध्ये फरशीवर व गॅलरीमध्ये रक्ताचे डाग पडलेले दिसले. त्यावेळी पोलिस अंमलदार विशाल ठोंबरे यांनी तात्काळ फॉरेन्सिक टीमला बोलावून सदर रक्ताचे सॅम्पल पुरावे तपासकामी जमा केले. तसेच बंका सफायर सोसायटी, आंबिका हॉटेल रोड, पिसोळी, उंड्री, कात्रज कोंढवा रोड परिसरातील एकुण ७२ सीसीटीव्ही कॅमेरेची पडताळणी करून सदर सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने व घटनास्थळी मिळुन आलेल्या फुटेजमध्ये आरोपी मुस्तफा शकील अन्सारी हा त्याच्या मोबाईलवरून बोलत असल्याचे दिसून आले. त्यावेळी सदर मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विशलेषक पोलिस हवालदार प्रतिक लाहीगुडे यांनी विश्लेषण करून सदर आरोपी हा कोंढवा येथे असल्याचे समजले.
त्याला कोंढवा हद्दीतुन ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्याने गुन्हयात चोरी केलेले सोन्याचे दागिणे तसेच गुन्हा करत्यावेळी वापरलेली दुचाकी गाडी व मोबाईल फोन असा एकुण ९ लाख २२ रुपये किंमतीच्या मुद्देमाल हस्तगत करून सदरचा गुन्हा हा उघडकिस आणला आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५. पुणे शहर राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलिस हवालदार प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *