खंडणी दे… नाहीतर विकेट टाकतो, टोळक्याची दहशत : पान विक्रेत्याला दिली धमकी

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : दर महिन्याला दोन हजार रुपयांची खंडणी देण्याची धमकी एका टोळक्याने पान टपरी चालकाला दिली. खंडणी न दिल्यास ‘विकेट’ टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ३०८ (५), ४२७, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून हा प्रकार रविवारी रात्री सवा नऊच्या सुमारास पिसोळी येथील शंभुनाथ शॉप येथे घडला.
( Pay Up or Get Taken Down — Extortion Gang Threatens Pune Shopkeeper Says We’ll Knock You Out)

स्वप्नील सुधिर भिंगारदिवे (वय २८, रा. टिळक गनर, कोंढवा), सागर मुकुंद आहेरराव (वय २९, रा. केदारेश्वर रेसिडेन्सी, येवलेवाडी, कोंढवा), केतन गंगाराम मोरे (रा. सनशाईन सोसायटी जवळ, पिसोळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संदिपकुमार प्रेमशंकर वर्मा (वय २८, रा. व्यंकटेश पॅराडाईज, पिसोळी) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फिर्यादीच्या दुकानावर जाऊन दोन हजार रुपयांची हप्ता स्वरुपात खंडणी मागितली. फिर्यादी वर्मा यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी भिंगारदिवे याने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, आहेरराव याने जळती सिगारेट, बिअरची बाटली व काऊंटरवरील सामान फेकुन नुकसान केले. तसेच, मोरे याने ‘हत्यार काढ; याची विकेट टाकू’ असे म्हणून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *