एसआरएमध्य मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, त्या ठेकेदारांचे कॉन्ट्रक्ट रद्द करा : अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण (एसआरए) प्रकल्पात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्यामुळे पाच वर्षांपर्यंत ज्या ठेकेदारांनी काम सुरु केले नाही. त्या सर्व कंत्राटदारांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करा. तसेच झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याचा प्रस्ताव पाठवावा. विकासकांकडून १५ हजार रुपये भाडे वसूल करावे. जे नागरिक अपात्र ठरले आहे. त्यांच्या अपीलावर महिनाभरात निर्णय घ्यावा, अशा मागण्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केल्या आहेत. ( Prakash Ambedkar Demands Cancellation of SRA Contractors Over Massive Corruption Allegations)

वंचित बहुजन आघाडी तर्फे सोमवारी महायुती सरकार व एसआरएच्या भ्रष्ट, भोंगळ व बिल्डर धार्जिण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील एसआरएच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, शहराध्यक्ष अ‍ॅड. अरविंद तायडे यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिवाजीनगर परिसरात अ‍ॅग्रीक्लचर कॉलेज चौक याठिकाणी पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. या भागातील वाहतूक देखील काही काळासाठी वळविण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. डोक्यावर निळया टोप्या आणि हातात पक्षाचे निळे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत मोर्चा एसआरए कार्यालयाच्या दिशेने रवाना झाला. मात्र, पाेिलसांनी मोर्चा कार्यालयाच्या रस्त्यावरच मोर्चा अडवला.

याबाबत अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वस्तात घरे गरीबांना उपलब्ध करण्यापेक्षा बिल्डरचा खिसा भरण्याचे धोरण अवलंबले आहे. मात्र, झोपडपट्टीधारक लोकांना स्वस्तात घरे कशी मिळतील, न्याय मिळेल, राहत्या जागी घर कसे मिळेल याबाबत आम्ही बाजू मांडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *