पुण्यात बेकायदेशीर गुटखाचा पर्दाफाश, पोलिसांकडून दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

डीसीएन न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यातील चंदननगर परिसरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा करून विक्री केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुनवारा सोसायटीच्या आवारात ही कारवाई करण्यात आली.
( Illegal gutkha busted in Pune police register case against two people)

गणेश चंद्रकांत पाटील (वय ३१) आणि रामलाल गायकवाड देवासी (वय ३२, दोघेही वडगावशेरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी आरोपींवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम २६(२)(i)(iv) तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई २५ ऑक्टोबर रोजी करण्यात आली असून पोलीस अंमलदार विकास संपत कदम यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींकडे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असून ते विक्रीसाठी ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आरोग्य विभागाने अशा पदार्थांवर बंदी घातलेली असतानाही आरोपी हे पदार्थ विक्रीसाठी ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत होते, असे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *