डीसीएन न्यूज नेटवर्क
पुणे : आंदेकर-कोमकर टोळी युद्धामधून पुन्हा एकदा एकाचा बळी गेला. वनराज आंदेकर खून प्रकरणातील एका गुंडाच्या भावाचा गोळीबार करून तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला. ही घटना कोंढवा येथील खडी मशीन चौकात शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. ( Gang War Erupts Again in Pune Ganesh Kale Shot Dead in Andekar–Komkar Rivalry)
प्राथमिक माहितीनुसार, गणेश काळे असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. गणेश हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ असल्याची प्राथिमक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाला सुरुवात केली आहे. पुण्यात गणेश काळे याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
