विशेष प्रतिनिधी
मुंबई: उत्तर भारतीय विरुद्ध मराठी असा वाद नाही. मात्र जाणीवपूर्वक भाज उत्तर भारतीय आणि मराठी वाद तयार करत असून त्यांना उत्तर भारतीय मत हवी आहेत. भारतीय जनता पक्षाच्या एआय जनरेटर माकडाने हे सगळं केलं आहे, असा आरोप मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केला आहे. ( BJP inciting North Indian vs Marathi controversy MNS leader Sandeep Deshpande alleges)
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीची घोषणा बुधवारी झाली. त्यानंतर मुंबईमध्ये “उत्तर भारतीय बटोगे… तो पिटोगे…! असे बॅनर लागले. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मिडीयावरती पोस्ट केली आहे. काल ज्या पद्धतीने मुंबईमध्ये पोस्टर लावली त्याला उत्तर देत आहोत, मराठीच अपमान सहन केला जाणार नाही असा तो मेसेज सोशल मिडीयावरून दिला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
अदानी फॅमिलीसाठी त्यांची युती आहे. हॅपिनेस इंडेक्स मुंबईकरांचा किती आहे. जनता खुश असेल तर ती प्रगती असते. एक अटल सेतू बांधला पण रस्ते खड्ड्यात आहेत. रोज उठून कोण जात अटल सेतूवरून, दोन-दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. गेली 25 वर्ष सत्तेत नव्हते का? पहारेकरी म्हणून घेत होते ना ते, काय झोपा काढत होते का? असा सवालही देशपांडे उपस्थित केला आहे.
आशिष शेलारांनी काल राज ठाकरेंना काही प्रश्न केले होते. त्यावर पलटवार करताना संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, शेलार यांना पक्षात कोण विचारत नसल्याने त्यांना रामदास आठवले चावले आहेत असा सत्तेतील लोक गुंडांसारखे बोलायला लागले तर काय करायचं अमित साटम यांचा मेव्हणा, शेलार यांचा भाऊ, दरेकर यांचे भाऊ… अजून पण लिस्ट निघेल. बात निकलेगी तो लंबी जाएगी.
अडाणीचा फॅमिलीसाठी महापालिका ताब्यात पाहिजे का हे पण सांगावं, असे सांगत ते म्हणाले, कौतुक वाटलं म्हणून व्हिडिओ ट्विट केले. यांच्या डोक्यात हिरवा रंग आहे. आशिष कुरेशी ही मुंबईला लागलेली बुरशी आहेत. रझा अकादमीचा मोर्चा निघाला तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होते. कोण आलं बाहेर? नवाब मलिक यांच्या मांडीला मंडी लावून बसले ते काय आम्हाला शिकवता. नवाब मलिकांना सोडविण्याचे काम फडणवीस यांनीच केले. ज्या भुजबळ यांच्यावर आरोप केले त्यांना मंत्रिपद दिले. हसन मुश्रीफांना त्यांनी घेतलं. किरीट सोमय्या गेले होते हातोडा घेऊन काय झालं त्याचं?
