देशासह राज्यात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. सर्वत्र निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच राज्यात जागावाटपावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तिढा असल्याचे दिसून येत आहे. अशातच अनेक बातम्या समोर येत आहे. जागांबाबत शक्यता वर्तवण्यात येत आहेत, या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना जागावाटपाबाबत चित्र लवकरच स्पष्ट होईल. 99 टक्के काम झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करू असं अजित पवार बोलताना म्हणाले.
अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. रायगडमधून खासदार सुनील तटकरे हे उमेदवार असतील, असं त्यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा आज संध्याकाळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असं त्यांनी जाहीर केलं. तसेच आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर शिरुरच्या जागेच्या उमेदवाराची घोषणा करु, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांनी यावेळी महायुतीच्या जागावाटपाबाबतही महत्त्वाची माहिती दिली.
महायुतीत 48 जागा मध्ये कोणती कोण लढवणार याबाबत 99 टक्के ठरलं आहे. 28 तारखेला मुबईत पत्रकार परिषद घेऊ. आता सगळे उमेदवार ठरले आहेत. राहिलेले सगळी नाव 28 तारखेला जाहीर होईल. असंही अजित पवार म्हणाले.
महायुती 48 जागा लढवणार आहे. अनेक जणांनी फॉर्म भरले आहेत, बाकी जागा 28 तारखेला जाहीर करू. शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्ष प्रवेश देतोय. दुसरी जागा तिकडे जाहीर करू. मीडियात जागेबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागा वाटपाबाबत व्यवस्थित मार्ग काढला गेला आहे. मित्र पक्षाने जागा वाटपाबाबत सहकार्य केलं. आज आमदार मंत्री यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आमदार, विधानसभा आणि मंत्री लोकसभा निवडणुकीत काम करतील. स्टार प्रचारक म्हणून लवकरच जाहीर करू. आमचे प्रमुख धनंजय मुंडे असतील
बारामतीच्या जागेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले,कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या. बारामतीचा उमेदवार 28 तारखेला जागा जाहीर करतो. तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच आमचा उमेदवार असेल. सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही.उदयनरांजेना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील. नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं याच हेतून आम्ही सध्या काम करतोय.
