विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी म्हणून तर ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची सर्वोत्तम सीईओ म्हणून निवड झाली आहे.
( Chandrapurs Vinay Gowda was the best District Collector and Thanes Rohan Ghuge was the best CEO.)
या मूल्यांकनात भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्या मार्फत सर्व जिल्हा परिषद सीईओ आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कामगिरीचे काटेकोर मूल्यमापन करण्यात आले होते. कार्यालयीन सुधारणा, डिजिटल यंत्रणांचा वापर, तक्रार निवारण व्यवस्थापन, नागरिकसुलभ सेवा, गुंतवणुकीला प्रोत्साहन, वर्क कल्चर सुधारणा अशा १० मुख्य निकषांवर आधारित हे मूल्यमापन झाले.
या योजनेमुळे राज्य प्रशासनात स्पर्धात्मक कार्यसंस्कृती रुजत असून, जिल्हा पातळीवर कार्यरत अधिकारी कार्यालयीन कार्यपद्धती अधिक पारदर्शक, जलद आणि परिणामकारक करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेमुळे राज्य सरकार भविष्यातही असे मूल्यांकन आधारित कार्यक्रम राबवण्याच्या तयारीत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त या निकालाची घोषणा ‘एक्स’ या समाजमाध्यमाद्वारे केली. “
राज्यातील सर्वोत्तम जिल्हाधिकारी (TOP 5 District Collectors):
विनय गौडा – जिल्हाधिकारी, चंद्रपूर – ८४.२९ गुण
अमोल येडगे – जिल्हाधिकारी, कोल्हापूर – ८१.१४ गुण
आयुष प्रसाद – जिल्हाधिकारी, जळगाव – ८०.८६ गुण
अजित कुंभार – जिल्हाधिकारी, अकोला – ७८.८६ गुण
राहूल कर्डिले – जिल्हाधिकारी, नांदेड – ६६.८६ गुण
राज्यातील सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (Top 5 ZP CEOs):
रोहन घुगे – ठाणे जिल्हा परिषद – ९२ गुण
विनायक महामुनी – नागपूर जिल्हा परिषद – ७९.४३ गुण
गजानन पाटील – पुणे जिल्हा परिषद – ७५.४३ गुण (पुणे विभागात प्रथम)
अशिमा मित्तल – नाशिक जिल्हा परिषद – ७५.४३ गुण
वैभव वाघमारे – वाशीम जिल्हा परिषद – ७२ गुण
