अजामीनपात्र वॉरंटनंतर संजय राऊत यांची पळापळ, तातडीने शिवडी न्यायालयात झाले हजर

पुणे : मेधा किरीट सोमय्या मानहानी प्रकरणात शिवडी न्यायालयाने अजामीनपात्र वाॅरंट बजावल्यावर शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची चांगलीच पळापळ झाली. दुपारी तातडीने शिवडी न्यायालयात हजर होऊन अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतलामानहानी प्रकरणात संजय राऊत गेल्या काही सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा मेधा सोमय्या यांनी आपल्या वकिलांमार्फत न्यायालयाच्या निदर्शनास आणला हाेता. त्यानुसार न्यायालयाने संजय राऊत यांच्याविरोधात झालेल्या सुनावणीनंतर अजामीनपात्र वॉरंट काढले हाेते. वॉरंट रद्द करून घेण्यासाठी पुढील तारखेला संजय राऊत यांना न्यायालयात उपस्थित राहणे आवश्यक हाेते. मात्र त्यापूर्वीच राऊत न्यायालयात हजर झाले.