विशेष प्रतिनिधी
मुंबई : गलितगात्र झालेल्या ठाकरे गटात पुन्हा थोडीफार ऊर्जा यावी यासाठी अगतिक झालेले उध्दव ठाकरे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना गेल्या अनेक दिवसांपासून साकडे घालत आहेत. आज शिवसेना वर्धापनदिन मेळाव्यात त्यांनी पुन्हा राज यांना निमंत्रण दिले. ( In the name of uniting the power of Marathi people aggressive Uddhav Thackeray again attacks Raj Thackeray)
उद्धव ठाकरे यांनी पुन्हा महाराष्ट्र, मराठी म्हणत गुजराती वाद पेटविण्याचा प्रयत्न आपल्या भाषणात केला. बातम्या सुरू आहेत. काय होणार. कसलं. होणार का. होणार की नाही होणार कळेल ना. यांच्या मनात आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करणार आहे, असे म्हणत मनसेसोबत युतीसाठी आपण किती घायकुतीला आलो हे दाखवून दिले.
पण त्याला मराठी आणि महाराष्ट्र वाचविण्यासाठी असल्याचा मुलामा देत मनसे आणि ठाकरे गटाची युती होण्यात विरोध केला जात असल्याचा कांगावा करत म्हणाले, पण ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर गाठीभेटी घेऊ लागले. हॉटेलात भेटतात. मालकाचे नोकर तुम्ही. जर का मुंबईवर ताबा मिळाली नाही, मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आली तर तुमचे काय होणार? मराठी माणसाच्या ताब्यात मुंबई गेली तर मालकाचं कसं होणार. मालकाच्या मित्राचं कसं होणार म्हणून मराठी माणसाची शक्ती एकवटता कामा नये. म्हणून शेठजीचे नोकर,. आणि नालायकपणे वर्धापन दिन साजरा करणारे शेठजीच्या नोकरांचे नोकर आहेत.
काँग्रेसशी युती करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली दिल्याचा आरोप होत असलेले उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामोनिशान महाराष्ट्राच्या धर्तीवरून मिटवून टाकल्याशिवाय राहणार नाही. भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू. आज तर मी तयारीने उभा आहे. ९२-९३ साली जेव्हा दंगा भडकला होता. तेव्हा तुम्हीच रस्त्यावर उतरला होता. तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे आली होती. बाळासाहेब आता बस्स झालं. पुरे झालं. ती व्यक्ती कोण सांगणार नाही. ते हयात आहेत.
ठाकरे म्हणाले, नाना पाटेकर यांचा प्रहार चित्रपट आहे. त्यात नाना पाटेकर गुंडासमोर उभा राहोत. सांगतो कम ऑन किल मी. तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे. म्हणतोय कम ऑन किल मी. असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभचा पिक्चर होता ना तो ॲम्ब्युलन्स घेऊन येतो. तसं येत असाल तर ॲम्ब्युलन्स घेऊन या, येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल.
