सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं – सत्यजीत तांबे

नाशिक पदवीधर निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित तांबे हे विजयी होणार का? याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, सत्यजित तांबे हे विजयी झाले आहेत. विजयानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल असेही तांबे म्हणाले. मतदान बाद होण्याचं प्रमाण मोठं आहे. बाद मतदानामुळे माझे मताधिक्य कमी झाल्याचेही तांबे यावेळी म्हणाले.

या निवडणुकीत सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिले. मी लोकांना प्रेम दिलं आहे, पैसे वाटले नाहीत. मी सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. “सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिलं आहे. मी पैसे वाटले नाहीत तर लोकांना प्रेम दिलं. असे ते म्हणाले.4 फेब्रुवारीला मी पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सत्यजीत तांबे यांनी दिली. या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल सत्यजीत तांबे यांनी जनतेचे आभार मानले. या निवडणुकीत अनेक संघटना आणि संस्थांनी मला मदत केली आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी तीन टर्म चांगली सेवा केली आहे. आता अशीच सेवा माझ्याकडून होईल. असेही ते म्हणाले.