शिंदे गट घेणार मोठा निर्णय; आदित्य ठाकरेंची आमदारकी धोक्यात?

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने अधिवेशनाची तयारी सुरू आहे. शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतले आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी व्हीप बजावला जाणार आहे. हा व्हीप आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू होणार आहे. त्यामुळे जर व्हीप स्वीकारला नाहीतर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.

पक्षनाव व चिन्ह शिंदे गटाला भेटल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील हालचालींना वेग आला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची आज महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीमध्ये आमदारांना व्हीप बजावला जाणार आहे. सर्व 56 शिवसेना आमदारांना व्हीप बजावणार असून हा व्हीप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सुद्धा लागू असणार आहे. तसेच, जर कुणी व्हीप पाळला नाहीतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाईल, असा इशाराच भरत गोगावले यांनी दिला आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरदार गाजणार आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर जे आमदार निवडून आले त्या सगळ्या आमदारांना हा व्हीप लागू होईल. जर कुणी व्हीप पाळला नाहीतर अपात्रतेची कारवाई केली जाईल असा इशाराच गोगावले यांनी दिला. यामुळे ठाकरे गटातील आमदार शिवसेना शिंदे गटाचा व्हीप माननार की धुडकावणार यावरुन राजकारण तापणार आहे.