हसन मुश्रीफ यांच्या मुलांना अटकपूर्व जामीन देण्यास सत्र न्यायालयाचा नकार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्या मुलांना तातडीने अटकपूर्व जामीन देण्यास सत्र न्यायालयाचा नकार दिला आहे. संपूर्ण सुनावणी नंतर निकाल देण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

हसन मुश्रीफ यांची तीन मुले नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जामीन अर्जाचा विरोध करत मुंबई सत्र न्यायालयात लेखी उत्तर दाखल केले. मुश्रीफ बंधूना अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केला. अटकपूर्व जामीन दिला तर ईडी करत असलेल्या तपासावर परिणाम हाेण्याची भीती व्यक्त केली. यावेळी ईडीने पी. चिदंबरम यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. त्याचबराेबर तपासात पुरेसे स्वातंत्र्य देण्याची मागणी केली. दोन वेळा समन्स देऊन देखील नाविद मुश्रीफ हे ईडीसमोर चौकशी साठी हजर झाले नाहीत असे न्यायालयास सांगितले.