मोदी सरकारचे आज मंत्रीमंडळ विस्तार…! महाराष्ट्रातून कुणाला मिळणार मंत्रीपदं?



देशात २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले, आणि ७ वर्षात देशात अनेक बदल घडले आहेत. या ७ वर्षांमध्ये अनेक वेळा मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र आज मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्री मंडळ विस्ताराची विशेष चर्चा आहे. मोदी सरकार दुसऱ्यांना निवडून आल्यावर हा पहिलाच मंत्रीमंडळ विस्तार आहे, त्यामुळे याची अधिकच चर्चा आहे. सर्व जातीय राजकारण बघता, आणि नेत्याची कार्यकुशलता बघता हे मंत्री मंडळ विस्तार पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातून या मंत्रीमंडळात कोण असेल याचे चर्चे सर्वत्र आहेत. हे मंत्रीमंडळ वित्सार इतके खास का? आणि महाराष्ट्रातून कोणत्या नावांची चर्चा होतेय, जाणून घेऊयात.

गेल्या काही दिवसात काही मंत्रीपदं रिक्त झाली आहेत, आणि असलेल्या मंत्र्यांवर अतिरिक्त भार असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा विस्तार महत्वाचा असणार आहे. त्यातून केंद्राच्या मंत्रीमंळात आपले नाव असावे अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे. मात्र यावेळेला कोणत्या नेत्यांचा डाव बरोबर बसतो, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. त्यातून नुकतीच बातमी आली आहे कि केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. म्हणून नागरिकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.



मंत्रिमंडळ विस्तारात जवळपास 17 ते 22 नवीन मंत्र्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. काही मंत्र्यांना अतिरिक्त मंत्रीपदाचा कार्यभारही मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक मंत्र्यांची नावं मंत्रिमंडळातून कमी होतील असाही एक अंदाज वर्तवला जातोय. मंत्रिमंडळात सामील होण्याची चर्चा असणारे नेते आता हळूहळू दिल्लीत पोहोचू लागले आहेत, राज्यातून खासदार नारायण राणे दिल्ली पोहोचले आहेत. राज्यातील इतर अनेक नावांची चर्चा आहे.

कपिल पाटील, हिना गावित, रणजीत निंबाळकर, भागवत कराड यांची नावे देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. कपिल पाटील सध्या दिल्लीत आहेत. एबीपी माझाने त्यांचा संपर्क साधला असता ओबीसी संसदीय समितीची उद्या बैठक आहे, त्यासाठी दिल्लीला आलो असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 

नारायण राणे देखील दिल्लीत आहेत. नारायण राणे यांना भाजपचे राष्ट्रीय अ्ध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यास सांगण्यात आलं आहे.  रणजीत निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते मुंबईतच होते, मात्र आता ते फलटणला निघाले असल्याची माहिती मिळत आहे. भागवत कराड देखील मुंबईतच आहेत. 


त्यामुळे महाराष्ट्रातून या मंत्रीमंडळात कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतो, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. आणि या प्रश्नाची उकल होण्यात थोडाच अवधि शिल्लक आहे. ६ वाजता मंत्रीमंडळ विस्ताराविषयी स्पष्ट माहिती प्राप्त होईल. तोवर कोण बाजी मारतं, हे बघणं महत्वाचं ठरेल.