
कोरोना काळात सगळ्यात जास्त कुणाचं नुकसान झालं असेल तर ते गोर गरीबांनंतर विद्यार्थ्यांचं आहे. कोरोना आणि महामारीचा असर त्यांच्या भविष्यावर पडला आहे. कारण यामुळे परीक्षा घेण्याची पद्धत आणि त्यावर निकाल देण्याची पद्धत देखील बदलली आहे. तर अखेर महाराष्ट्रात १०वीची परीक्षा झाल्यानंतर तिचा निकाल उद्या लागणार आहे. ही परीक्षा जरी वेगळ्या स्वरूपाची असली, तरी देखील निकालाची उकत्सुकता आणि चिंता दोन्ही विद्यार्थ्यांच्या मनात आहेत.
दुपारी १ वाजेच्या सुमाऱ्यास बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना हा निकाल बघायला मिळेल. कोरोनामुळे १०वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यावेळी सुमारे १ ते दीड महीना उशीराने लागतोय. मात्र एकदाचा निकाल हातात आल्याने पुढील एडमिशन प्रोसेस व्यवस्थित पार पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. अखेर सर्व कोरोनावर अवलंबून असणार आहे.
लॉकडाऊनमुळे दहावी बारावीचे निकाल लांबणीवर पडले आहेत. मात्र दहावीच्या निकालाची आता प्रतीक्षा संपली आहे. आता बारावीचे विद्यार्थी आणि पालकही निकालाची वाट पाहत आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ९ लाख ९ हजार ९३१ मुले तर ७ लाख ४८ हजार ६९३ विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
दहावीचे वर्ष अतिशय महत्वाचे असे वर्ष मानले जाते. कारण यावर पुढील करिअरची वाटचाल अवलंबून असते. त्यामुळे १०वीच्या विद्यार्थ्यांना निकालाची किती प्रतीक्षा असेल याची कल्पना आपण सगळे करुच शकतो, त्यातून कोरोनाच्या काळात हे निकाल येत असल्याने याची उत्सुकता आणि काळजी अधिकच असेल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना गल्ली ते दिल्लीच्या माध्यमातून शुभेच्छा.
