महाराष्ट्राची झाली दुर्दशा पार, उद्धवा अजब तुझे सरकार…



आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा पूराने अनेक परिवारांना अक्षरश: उद्ध्वस्त केले आहे. आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा जनता सरकार कडे मोठ्या आशेने बघतेय, आणि सरकारचे उत्तर, तुम्ही संयम बाळगा, सरकार करेल सर्व, असेच आहे. महाराष्ट्रात कोकण, कोल्हापुर, सांगली खासकरून महाड आणि चिपळूण सारख्या ठिकाणी पुराने अक्षरश: थैमान घातले आहे. पुराचे दृश्य जरी बघितले तरी आंगावर काटा येतो, असे असताना सरकारतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तब्बल 48 तासांनंतर भेट दिली, त्यांच्या आधीच विरोधी पक्षातील गिरीश महाजन आणि प्रवीण ारणदरेकर या ठीकाणी पोहोचले.

असे म्हणतात कोकणवासी कधीच कुणाकडूनही काहीही मागत नाहीत. मात्र आता त्यांच्यावर संकटांचा पर्वत कोसळला आहे. मात्र अद्याप पूरग्रस्तांसाठी कुठलाही मदतनिधी जाहीर करण्यात आलेला नाही. अद्याप कुठल्याही प्रकारची मदत या पूरग्रस्तांना सरकारने केलेली नाही. विविध संस्था, काही ग्रुप्स एकत्र येऊन मदत करताएत, मात्र सरकार म्हणून नागरिकांच्या काही अपेक्षा या आघाडी सरकारकडून आहेत, आणि त्या पूर्ण करण्यात उद्धव सरकार महर सपशेल फेल झालेले आहे.



यावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मत व्यक्त करत म्हटले कि, जनतेसोबत सध्या जे काही होत आहे, त्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचा आक्रोश आहे. तो आक्रोश त्यांना व्यक्त करायचा आहे, ते काही तुमच्या विरोधात नाहीत, त्यांना यावेळी तुमची गरज आहे. अशा वेळी त्यांच्या अंगावर धाऊन जाणे हे पूर्णपणे चुकीचे आहे. तसेच अशा क्षणी टोलवाटोलवी करत केंद्र सरकार कडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. केंद्र सरकार मदत करेलच मात्र लोकं आपली आहेत ना, असे असताना राज्य सरकारला जबाबदारी घ्यावीच लागेल.

या पूर प्रसंगाने एका गोष्टीची आठवण झाली. 2019 साली कोल्हापुर, सांगली येथे असाच पूर आला असताना राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रमुख शरद पवार, आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे देखील बांधावर जनतेच्या मदतीसाठी पोहोचले होते, त्यावेळी त्यांनी पंचनामे नंतर करूयात आधी शेतकरी बांधवांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे अशी सरकार कडे मागणी केली होती. मात्र आज हे दोन्ही पक्षप्रमुख सरकारमध्ये असताना जनतेपासून तोंड का फिरवत आहेत का तेव्हा हे सर्व येऊ घातलेल्या निवडणूकीसाठी केलं होतं असा प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

एकूणच महराष्ट्रात सरकारमध्ये तीन तीन पक्ष एकत्र असून सुद्धा गरजेच्या वेळेला तीन्ही पैकी एकही जनतेच्या मदतीसाठी धावून गेले नाही. आणि जनता कदाचित हे कधीच विसरू शकणार नाही. महाराष्ट्र एकूणच कोरोना, अतिवृष्टि, पूर आणि इतर भीषण परिस्थितींमुळे आता कंटाळला आहे, महाराष्ट्रावर लागलेली ही साडेसाती कधी संपते आता हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.